Maharashtra Cabinet Expansion : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी बुधवारी (12 जुलै) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) चर्चा केल्याचं समजतं. परंतु मीडियासोबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की सत्तेत सहभागी झाल्यावर आम्ही सदिच्छा भेटीसाठी इथे आलो होता. आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतंही पद मागितलेलं नाही." तसंच सत्ताधारी महायुतीमध्ये कोणतीही फूट नाही. महाराष्ट्रात एक दोन दिवसात खातेवाटप होईल, असंही प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले.
शाह, पवार आणि पटेल यांच्यात एक तास चर्चा
भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात एक तास चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पटेल म्हणाले की, "मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची बैठक झाली. सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काम सुरु आहे. यात काही अडचण नाही. एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल." दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवरुन मुंबईत 1.45 वाजता आपल्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले.
तर दुसरीकडे 18 जुलै रोजी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. यात काही अडचणी तर येणारच. सध्या सर्व खाती भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती देण्यासाठी या दोन्ही पक्षांना काही विभाग सोडावे लागतील. सत्तेत सहभागी झाल्यानंतर 4 ते 5 दिवसात आम्ही खातेवाटपाचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. काही दिवसांपूर्वीच आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर आम्ही तीन बैठका घेतल्या.
अजित पवार गटाच्या 9 आमदारांचा शपथविधी
दरम्यान 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 35 हून अधिक आमदारांच्या मदतीने बंड केलं आणि शरद पवार यांना मोठा धक्का दिला. अजित पवार हे भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील झाले होते. त्याच दिवशी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेलं नाही.
VIDEO : Meeting With Amit Shah : Ajit Pawar, Praful Patel आणि अमित शाह या तिघांमध्ये तब्बल एक तास बैठक
हेही वाचा