पुणे : रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना अजित पवार गट (Ajit Pawar) पाठिंबा देणार, बारामतीचा उमेदवार बदलणार या चर्चांवर आता स्वतः अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादीने महादेव जानकरांना पाठिंबा दिला ही विरोधकांनी पसरवलेली अफवा असल्याचं सांगत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार असे अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी सांगितलं.


बारामतीचा उमेदवार बदलणार नाही


राज्यातील महायुतीच्या जागावाटप अद्याप जाहीर झालं नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा , धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार. महादेव जानकर यांना राष्ट्र्वादी पाठिंबा देणार ही केवळ अफवा असून ती विरोधकानी पसरवली आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही.


रायगडमधून सुनील तटकरे लढणार


अजित पवार म्हणाले की, तिन्ही पक्षांनी एकत्रित चर्चा करुन महायुतीत जागावाटपाचे 99 टक्के काम पूर्ण केलं आहे. 28 तारखेला मुंबईदेवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार.   रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत. आढळराव पाटील 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. त्यांचा पक्षप्रवेश आज होणार आहे. इतर उमेदवारांची नावे 28 तारखेला जाहीर करण्यात येणार.


विजय शिवतारेंचे निर्णय एकनाथ शिंदे घेणार


बारामतीमधून विजय शिवतारे यांनी लोकसभेला लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर टीकाही केली. त्यावर बोलताना विजय शिवतारेंचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं अजित पवारांनी सांगितलं. 


राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारांना त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या आमदारासोबत आणखी पाच ते सहा जणांची टीम असेल. निवडणुकीचे प्रचार नियोजन कसे असावे हे ठरवण्यात आलं आहे असंही अजित पवार यांनी सांगितलं. 


बारामतीमध्ये तुमच्या मनातला उमेदवार 


कारण नसताना पत्रकारांनी राष्ट्रवादीला तीन किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या चालवल्या. बारामतीचा उमेदवार 28 तारखेला जागा जाहीर करतो. तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच आमचा उमेदवार असेल. सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही.उदयनरांजेना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं याच हेतून आम्ही सध्या काम करतोय. 


ही बातमी वाचा: