मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर, भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. काँग्रेसमधील (Congress) जुन्या जाणत्या नेत्यांच्या फळीतील एक असलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan BJP) यांनी काँग्रेस सोडणं हे काँग्रेसमधील नेत्यांना न पचणारं आहे. तसं गेल्या अनेक वर्षापासून अशोक चव्हाण यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरु होत्या. वडील शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) आणि त्यानंतर अशोक चव्हाण या दोघांना काँग्रेसने मुख्यमंत्रिपद दिलं. काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं चव्हाण घराणं इतक्या वर्षानंतर फुटलं. अशोक चव्हाणांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेतच, पण सोशल मीडियावरील प्रतिक्रिया खूपच बोलक्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर एबीपी माझाच्या माझा कट्टा (ABP Majha Katta) या कार्यक्रमातील एक व्हिडीओ फिरत आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 'माझा कट्टा'वर आले होते. त्यावेळी त्यांनी पक्ष फोडाफोडीवर भाष्य केलं होतं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे सुद्धा भाजप सोडणार होते, मात्र त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नैतिकता दाखवत विरोध केला. मनमोहन सिंगांनी चुकीचा पायंडा पडेल म्हणून गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. काँग्रेसने फोडाफोडीचे राजकारण केलं असतं तर आज भाजप या अवस्थेत नसतीच, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार 2017 मध्ये एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. त्यावेळी अजित पवारांना फोडाफोडीच्या राजकारणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले होते, "आज पंडितांना मुंडे हयात नाहीत, पण धनंजय मुंडे यांना कधीतरी खाजगीत विचारा, ज्यावेळेस धनंजय मुंडे यांना मी पक्षात घेतलं त्याच्या आधी वर्ष दीड वर्षांपूर्वी ते दिल्लीमध्ये धनंजय मुंडे आले होते. त्यावेळेस त्यांनी पवार साहेबांना सांगितलं, त्यावेळेस मीच अजित पवार म्हणून त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुंडे साहेबांना सोडू नका. काही घटना घडतात, परंतु त्याच्यातून पुन्हा चांगल्या पद्धतीने आपण बरोबर राहायला पाहिजे. वर्ष-सव्वा वर्ष आम्ही त्यांना पक्षात घेतलं नव्हतं. वर्षांनी पुन्हा ते भेटले, ते म्हणाले की तुम्ही जर घेणार असाल तर मग आम्हाला दुसरा पक्षाचा पर्याय शोधावा लागेल. आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्या पक्षात (भाजप) आम्हाला राहायचं नाही आणि त्या पद्धतीने घडलं.
मनमोहन सिंगांनी गोपीनाथ मुंडेंचा पक्षप्रवेश टाळला
आज आता मुंडे साहेब हयात नाहीत. आपल्याला माहिती नाही का, मुंडे साहेबांनी देखील भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांच्याबरोबर त्यावेळेस पाच आमदार होते. पाशा पटेल, प्रकाश शेंडगे, माधुरीताई मिसाळ, पंकजाताई मुंडे आणि अजून कोणतरी होतं. दिल्लीमध्ये आता त्यांचा पक्षप्रदेश घेणार, सगळं काही ठरलं असताना, अचानक डॉक्टर मनमोहन सिंग जी त्यावेळेस म्हणाले, त्यांना ज्यावेळेस सांगण्यात आलं वरिष्ठांच्याकडून की गोपीनाथ मुंडेंना पक्षप्रवेश द्यायचा आहे.
त्यावर मनमोहन सिंग म्हणाले, मी पंतप्रधान असताना, लोकसभेमधील उपनेते भारतीय जनता पक्षाचे त्यांना पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही. अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो. आणि मग आता काय करायचं, गाड्या तर सगळ्या आलेल्या होत्या. आता पक्षप्रवेश तर ठरला होता. मग सुषमा स्वराज यांच्याकडे सगळे गेले आणि सुषमा स्वराज यांना बहनजी बहनजी म्हणून थांबवलं. म्हणून त्या पक्षात ते राहिले. असं ते वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं, असं अजित पवारांनी सांगितलं.
सांगायचं तात्पर्य असं काही नाही, जर एखादी मोठी व्यक्ती देखील मुंडे साहेबांच्या सारखी, त्यांना जर वेदना तुम्हाला माहित नाही का? इथं त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो. आणि मुंडे साहेबांच्या बरोबर बाकीचे आमदार जाऊ नयेत, म्हणून देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार हे सगळे विनोद तावडे सगळे प्रयत्न करत होते. असं काही नाही आणि ज्या वेळेस धनंजय मुंडे यांनी सांगितलं आम्ही जाणार आहे, तर एक तरुण कार्यकर्ताम, चांगला कार्यकर्ता, मराठवाड्यांमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याला मी पक्षामध्ये वेलकम केलं. त्या ठिकाणी योग्य पद्धतीने संधी दिली, असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar Majha Katta : अजित पवारांचा जुना व्हिडीओ
संबंधित बातम्या