मुंबई: शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची  चिंता वाढली आहे. अजित पवारांच्या क्लीनचीटला आव्हान देणाऱ्या याचिकांवर  5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची (Ajit Pawar) चिंता वाढली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना 'क्लीन चिट' देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यानंतर आता या क्लीनचीटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँक घोटाळा प्रकरणामुळे (Shikhar Bank Scam) अजित पवार यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. 


शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, त्याला विरोध करत चार नवीन याचिका मुंबई  सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत. माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ असराजी साबळे, रामदास पाटीबा शिंगणे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत चार स्वतंत्र निषेध याचिका दाखल केल्या आहेत. 


ईओडब्ल्यूने सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना 'क्लीन चिट' देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत यापूर्वी सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत.  त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांनीही न्यायालयात धाव घेतली आहे


अजितदादांना क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा: संजय राऊत


अजित पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेने शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चीट दिल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते.  हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत खटले चालवायचे.   त्यासाठी लाखो कोट्यवधी रुपये सरकारच्या खात्यातून पैसे काढून खटले चालवायचे आणि मग संबंधित आरोपी  पक्षात आला की त्याच्याबद्दल पुन्हा चांगले बोलायचे. खटला चालवताना जो काही खर्च होतो तो कोणाच्या खिशातून  घेणार आहे. या खटल्यांचा  नरेंद्र मोदी यांच्याकडून घेणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.


आणखी वाचा


मी सकाळी लवकर उठतो, मग काय उपकार करता का? तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रिया सुळेंनी दादांचं नाव न घेता झोडपलं!