Ajit Pawar, बोकरवाडी; बारामती : "मी उद्या किंवा परवा दिल्लीला जाणार आहे. मी धड धाकट पणे जातो. माझी लै बदनामी केली. काहींनी सांगितले नक्षलवादी असतील. मी थेट आव्हान केलं. आई वडिलांनी चांगली नावं ठेवली आहेत. ढेकूण असलं बोललं जातं. खोटा प्रचार आणि प्रसार होतो", असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते बारामतीतील बोकरवाडीच्या सभेत बोलत होते.
आपल्याला खूपदा दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागलं
अजित पवार म्हणाले, पाणी बंद पाईपलाईनमधून आणले तर 3 ते चार गावांना याचा फायदा होईल. अनेक आमदार झाले प्रत्येकाने प्रयत्न केले. कुणी पाझर तलाव केला, जनाई शिरसाई करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला खूपदा दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागलं. जिरायती हा डाग पुसायला तुमची मदत लागणार आहे. पाऊस चांगला पडला आता धरणे भरली आहेत. नदी काठच्या भागांना अलर्ट केलं आहे. ज्या गोष्टी करता येतील त्या करतो आहे.
रामतीचा विकास या पाच वर्षात झाला आहे, मी एक पुस्तक काढले आहे ते मी सगळ्यांना देणार
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगितले की, विकासासाठी तुमच्या सोबत आलो आहे. भाऊबीजेच्या वेळी तुम्हाला पैसे मिळणार आहे. रक्षबांधनला पण देणार आहे. भाऊबीज दिवाळीत आहे. बारामतीचा विकास या पाच वर्षात झाला आहे. मी एक पुस्तक काढले आहे ते मी सगळ्यांना देणार आहे. काम दर्जेदार झालं पाहिजे. कुणी कामाला आडवं आलं तर सरकारी कामात अडथळा म्हणून पोलिसांकडून प्रेम पत्र पाठवेल. मी 3 आठवडे आलो नव्हतो पण काहींना वाटलं मी नाराज आहे. मी नाराज होत नसतो. मी सांगितले झालेला पराभव मी स्वीकारतो.
फायदा झालेला बटण दाबताना लक्षात ठेव म्हणजे झालं
ज्यांना बंधारे बांधण्याचा काम मिळेल. फायदा झालेला बटण दाबताना लक्षात ठेव म्हणजे झालं. दोन वेळा विहीर भरेल एवढं पाणी धरणातून वाहून गेले. नीरा नदीचं पाणी कऱ्हा नदीत टाकायचा माझा विचार आहे. यासाठी 1 हजार 25 कोटींची ही योजना आहे. यातून बारामती तालुक्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नाही. यामुळे 45 हजार एकरात पाणी मिळणार आहे. मी अर्थमंत्री आहे. कांदाप्रश्नी मी दिल्लीला गेलो होतो. निर्यात बंदी करू नका असे सांगितले होत्. आपण मार्ग काढू असे सांगितले आहे. विकासाला महत्त्व देण्याऐवजी भावनिक करण्याचा प्रयत्न करतात, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या