Ajit Pawar, सांगवी : "दुध भेसळ करणार आहे, हे सिद्ध झालं. त्याने भेसळ केलेली असेल तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी, इथपर्यंतचा आम्ही कायदा करणार होतो. आता भेसळीसंदर्भातील कायदा त्याठिकाणी कडक करणार आहोत. आम्ही अध्यादेश काढतोय. दुधात भेसळ करणारी व्यक्त सापडली तर आम्ही त्याला मोक्का लावणार आहोत", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुधात भेसळ करणाऱ्या लोकांना तंबी दिली आहे. ते सांगवी  येथे बोलत होते. 



खूप मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकार कडून आणतो


अजित पवार म्हणाले, पाऊस पडतो आहे. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. उजनी धरण 90 टक्के भरले आहे. नदी काठी आम्ही लक्ष देऊन आहोत. लोकांचे कसे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतो. डॉक्टर आणि कर्मचारी यांचे हे निवासस्थान इथे होणार आहे. खूप मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकार कडून आणतो आहे. लाडकी बहिण योजना सगळ्या महिलांसाठी आहे. फक्त त्यांचे उतपन्न अडीच लाखांच्या आत पाहिजे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं. एका वर्षानंतर शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  काही जण आमच्यावर टीका करतात हा चुनावी जुम्ला आहे, पण हे खोटं आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 


दुधाला 5 रूपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला 


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, इथे पाण्याचा प्रश्न आहे. दोन जिल्ह्याचे खराब पाणी येतं. त्यासाठी आपण खराब पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मोठा निर्णय घ्यायचा म्हटलं तर कारखाने बंद करावे लागतील, परत तुम्ही माझ्यावर याल. सरकारमध्ये नसतो तर वीज माफ करता आली नसते.  अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दुधाला 5 रूपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला आहे. आम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थ्यना आधार लिंक केलं तर 5 लाख विद्यार्थी बोगस होते. दुधात भेसळ केली जाते. काहींनी सांगितले की या विरोधात कडक कायदा आणा.  आम्ही फाशीची मागणी केली होती पण राष्ट्रपती यांनी मागणी मान्य केली नाही. दूध भेसळ करणाऱ्यांवर आम्ही मोका लावणार, चकी पिसिंग अँड पिसींग होणार आहे, अशी तंबीही अजित पवार यांनी दिली. 


 बेरोजगारी कशी कमी होईल यासाठी प्रयत्न करतोय


मी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालो आहे. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. फाफट पसारा सांगणार नाही, पण आता कोण कुणाला ढेकूण म्हणत आहेत. एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे. 40 रुपयापर्यंत साखरेचे दर करून द्या अशी मागणी आम्ही केली आहे. वाढवण जवळ आम्ही विमानतळ करणार आहोत. बेरोजगारी कशी कमी होईल यासाठी प्रयत्न करतोय. काही प्रकल्प बाहेर राज्यात जाणार होते ते आम्ही परत आणले. शिक्षणात आम्ही काय बदल करू पाहतोय.. काही तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. शिक्षण घेतल्यावर त्याला त्याचा फायदा होईल असा आमचा प्रयत्न असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Video : विरोधकांनी मनोज जरांगे अन् श्याम मानव यांच्या रुपाने देवेंद्र फडणवीसांवर कुत्रे सोडले : भाजप खासदार अनिल बोंडे