Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्थरातून संतापाची लाट उसळलीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानत अखेर आज (4 मार्च) धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resignation) हे राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेते आणि अजित दादांच्या अतिशय जवळचे नेते मानले जातात. अखेर आपल्या जवळच्या आणि मंत्री मंडळातील नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्याने पक्षाला ही हा हादरा मानला जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत एका ओळीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार
मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा (Dhananjay Munde Resignation)सुपूर्द केला आहे. त्यांनी नैतिकतेच्या मुद्यांवर आपला राजीनामा दिला असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक ओळीत यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा घेण्यास उशीर झाला नाही का? घटना घडून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटलाय, यात दिरंगाई झाली असं वाटत नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित दादांनी यावर भाष्य करणं टाळले आहे.
मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय- देवेंद्र फडणवीस
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नैतिकता म्हणून नाही तर अपरिहार्यता म्हणून राजीनामा- सुषमा अंधारे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकता म्हणून नाही तर अपरिहार्यता म्हणून घेतला आहे. मागच्या अधिवेशनात जो घटनाक्रम आमदार सुरेश धसणे सांगितला तो जशास तसा देशमुख हत्या प्रकरणातले फोटो बघून घडला आहे हे लक्षात येतं याचा स्पष्ट अर्थ आहे की देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं आधीच माहीत होतं. मग अडीच तीन महिन्यांपासून मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेतला जाईल असं वाक्य ते का उच्चारत होते, अडीच तीन महिने देवेंद्र फडणवीस यांनी कोणता राजकीय अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या डोळ्यात डोळफेक करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हे ही वाचा