Ajit Pawar on Satej Patil : छत्रपती घराण्याचा अपमान करण्यात आला. विरोधात असताना देखील इतकी मस्ती कसली? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर केली. छत्रपती घराण्याचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला असेही अजित पवार म्हणाले. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. महायुतीच्या सरकारने कोणत्याही घटकाला वंचित ठेवलं नाही. महायुतीच्या वतीने काम करणारे चांगले तगडे उमेदवार दिले आहेत. त्यांना सर्वांना विजयी करावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं. 


महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार 


महाराष्ट्राचे सूत्र कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला घ्यायचा आहे. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. महायुतीच्या सरकारने कोणत्याही घटकाला वंचित ठेवलं नाही असे अजित पवार म्हणाले. महायुतीच्या वतीने काम करणारे चांगले तगडे उमेदवार दिले आहेत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वांनी समन्वय साधला आहे. लोकसभेला झालेल्या काही चुका आम्ही यावेळी टाळल्या आहेत. या जिल्ह्यासाठी जे जे मागितलं ते आम्ही केलं आहे असं अजित पवार म्हणाले. विरोधक वाटेल तसे आरोप करत असल्याचे अजित पवार म्हणाले. 


लोकसभेप्रमाणे आता देखील विरोधक खोटा नेरेटिव्ह सेट करतायेत


लोकसभेप्रमाणे आता देखील विरोधक खोटा नेरेटिव्ह सेट करत आहेत. हे सरकार राज्यातील उद्योग इतर राज्यात पाठवतो हा आरोप खोटा आहे. काहीजण म्हणतात यांनी हे चोरलं त्यांनी ते चोरलंइथं कुणीही चोरा चोरी करत नाही कोर्टाच्या निर्णयाचे पालन होत असल्याचे अजित पवार म्हणाले. नागरिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय असे अजित पवार म्हणाले. राज्यभर आम्हाला लाडक्या बहिणी राखी बांधत आहेत, ओवळत आहेत. लाडकी बहीण ही सगळ्यात लोकप्रिय योजना झाली असल्याचे अजित पवार म्हणाले. 


आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक 


आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. समोरची लोकं या योजना बंद करायला निघाले असल्याचे अजित पवार म्हणाले. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आम्हाला प्रशासन कसं चालवायचं याचा अनुभव आहे. कोल्हापुरातील आमच्या दहाही उमेदवारांना विजयी करा असं आवाहन अजित पवार यांनी केलं. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज कोल्हापुरातून झाला आहे. यावेळी अजित पवार बोलत होते.