मुंबई : आता अजित पवारांना (Ajit Pawar) आणखी एक धक्का मिळाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय हिरामण खोसकर (Hiraman Khoskar ) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दरम्यान, लोकसभा  उमेदवारीच्या आशेने हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी सिल्व्हर ओक शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. अशात लोकसभा उमेदवारी मिळणे आणि काहींचं लोकसभेचं तिकीट कापलं जाणं, यामुळे काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटतानाही दिसत आहेत. 


हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला


अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय आणि सध्या काँग्रेसचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांनी शरद पवार यांची आज सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून हिरामण खोसकर यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात संधी देण्याची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह हिरामण खोसकर यांनी मंगळवारी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 


उमेदवारीच्या आशेने सिल्व्हर ओकच्या दारात


शरद पवार यांच्याकडून तीन वेळा निरोप पाठवून देखील आपण न आल्याने उमेदवारी दुसऱ्याला दिल्याची खोसकर यांना माहिती देण्यात आल्याचं समोर येत आहे. अजित पवार यांनी ज्यावेळी वेगळा निर्णय घेतला त्यावेळी छगन भुजबळ यांच्या एमईटी येथे पार पडलेल्या बैठकीला हिरामण खोस्कर काँग्रेसचे आमदार असताना देखील स्टेजवर उपस्थित होते.


अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजपात प्रवेश केला. यानंतर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक खासदार म्हणजेच हिरामण खोसकर नॉट रिचेबल असल्याने ते काँग्रेसला रामराम करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्यानंतर हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाने त्यांच्या दौऱ्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.


कोण आहेत हिरामण खोसकर?


नाशिक जिल्ह्यात एकूण 15 आमदार आहेत. यात काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. हिरामण खोसकर काँग्रेसचे असले तरी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांशी (Chhagan Bhujbal) त्यांचा चांगला संबंध आले. हिरामण खोसकर हे आदिवासी बहुल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मला केवळ निरोप आला होता अन्... दिल्लीत पाय ठेवताच राज ठाकरे काय म्हणाले?