Ajit Pawar, Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार जन सन्मान यात्रा मध्येच सोडून  तडकाफडकी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत पोहोचता अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये  बैठक  पार पडणार आहे. अजित पवार जन सन्मान यात्रा सोडून तडकाफडकी  बैठकीसाठी मुंबईत आले आहेत, त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आचारसंहितेपूर्वी विकासकामांच्या पूर्ततेसाठी, राज्यसभेच्या जागा संदर्भात आणि इतर विषयावर बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


अजित पवारांचा नाशिक दौरा 


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या जन सन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दिंडोरी (Dindori) मतदारसंघातून त्यांनी आपली यात्रा सुरू केली असून महिला भगिनींसह कार्यकर्त्यानीही त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी, भाषण करताना अजित पवारांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण लाडकी बहीण योजना राबवत असल्याचे सांगत, रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये पहिला हफ्ता जमा होणार असून मी कालच 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, यानंतर अजित पवार तडकाफडकी मुंबईला रवाना झाले होते. 


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 11 वाजता बोलावली बैठक 


अजित पवार नाशिकहून तातडीने मुंबईला रवाना झाले 


 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री निवासस्थानी रात्री उशीरा बैठक 


बैठकीचे कारण अस्पष्ट, आज बैठक करून उद्या पुन्हा उर्वरित दौऱ्यात अजित पवार सहभागी झाले  














इतर महत्वाच्या बातम्या 


Sujay Vikhe-Patil : मी फार छोटा माणूस, आपल्यालाच बदलून टाकलंय; मी आता माजी झालो, माजी सरपंच अन् माजी खासदार एकच : सुजय विखे