Sujay Vikhe-Patil, Ahmednagar : "सदाशिव लोखंडे साहेब तुम्ही म्हणाले घोषणा करा, पण मी आता माजी झालो. मला घोषणा करण्याचा अधिकार नाही. माजी सरपंच आणि माजी खासदार एकच आहे. आता आपलं काम फक्त निवेदन द्यायचं. आपण दोघेही जाऊन निवेदन देऊ. ज्यांना श्रीरामपूर जिल्हा करायचाय त्यांना माझ्या शुभेच्छा", असं भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे म्हणाले. ते श्रीरामपूर येथे बोलत होते.
सुजय विखे म्हणाले, लोखंडे साहेब तुम्ही जिल्हा जाहीर करा, तुम्हाला ही माझ्या शुभेच्छा. मी फार छोटा माणूस आहे. कॉन्स्टेबल, तलाठी अशी कामं मला सांगा. एव्हढे मोठे काम माझ्याकडुन होणार नाही. एखाद्या जिल्ह्याची घोषणा करायला मी एव्हढा मोठा नाही. मी नवीन ग्रामपंचायतची घोषणा करू शकत नाही, जिल्हा फार मोठा विषय आहे. आपल्यालाच बदलून टाकलंय, आपण कुणाची बदली करणार आहे? असा सवालही सुजय विखे यांनी केला.
माजी खासदार सदाशिव लोखंडे भाषण मुद्दे
श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी आहे.
डॉक्टर ( सुजय विखे ) आज घोषीतच करून टाका..
जिल्हा होणार तर श्रीरामपूरच होणार अशी घोषणा करून टाका..
म्हणजे लोकांच्या मनात शंका राहणार नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र मुंबईहून श्रीरामपूरच्या दिशेने निघालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना वेळेत कार्यक्रमासाठी पोहोचता आले नाही. त्यामुळे माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करत कार्यक्रम पार पडला. मात्र हाच धागा पकडत सुजय विखे यांनी मिश्किल भाष्य केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
येण्याचा माझा फार संबंध येत नाही, आमच्या घरात माझी भूमिका स्टेपनीची आहे
सुजय विखे म्हणाले, या कार्यक्रमात येण्याचा माझा फार संबंध येत नाही, आमच्या घरात माझी भूमिका स्टेपनीची आहे. गाडीचे मुख्य टायर पंक्चर होते, तेव्हा माझा स्टेपनी सारखा वापर करून मला पळवलं जातं. साहेब याठिकाणी येऊ शकले नाहीत म्हणजे परिवाराचा मुख्य टायर काही कारणास्तव पळू शकलं नाही. त्यामुळे स्टेपनी म्हणून मी कार्यक्रमाला आल्याचे मिश्किल वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
माझ्या घरात गाडीचे मुख्य टायर पंक्चर होते, तेव्हा माझा स्टेपनीसारखा वापर करून पळवलं जातं : सुजय विखे