Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी 'निकाल काही लागो, आमचा विठ्ठल एकच अजितदादा' अशा आशयाचा फलक लावत अजित पवारांना सहानभूती देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती शहरातल्या देसाई स्टेट भागात हा बॅनर लावण्यात आला आहे.
बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा मैदानात उतरवले. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी 5 मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मोठा लीड मिळाला. विशेष म्हणजे अजित पवारांच्या मतदारसंघातूनच सुप्रिया सुळेंना 47 हजारांचा लीड मिळाला.
महाराष्ट्रात कोणाच्या किती जागा?
भाजप
28 पैकी 9
स्ट्राईक रेट - 33.33 टक्के
-----
शिवसेना शिंदे गट
15 पैकी 7 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 46.30 टक्के
-----
राष्ट्रवादी (अजित पवार)
4 पैकी 1 जिंकली
स्ट्राईक रेट - 25 टक्के
----
ठाकरे गट
21 पैकी 9 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 42.85 टक्के
----
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
10 पैकी 8 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 80 टक्के
-----
काँग्रेस
17 पैकी 13 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 76.47 टक्के
बारामतीमध्ये शरद पवारांची बाजी
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचे होमग्राऊंड कुणाच्या बाजूने याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालं असून अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय. तर पराभवानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचं आवाहन केलं. मात्र, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजितदादांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या