ABP News C-Voter Opinion Poll : निवडणूक आयोगाने देशातील चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामसह पद्दुचेरीचा समावेश आहे. 27 मार्चला पाचही राज्यात मतदानाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज सी-व्होटरने सर्व्हेक्षण करुन ओपिनियन पोल जाहीर केला आहे.


140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं चांगलाच जोर लावलाय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही केरळवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळ काँग्रेसनंही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. सध्या केरळमध्ये सीपीआई (एम)च्या नेतृत्वखाली लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच एलडीएफचं सरकार असून पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत. 2016 च्या निवडणुकीत एलडीएफला 91 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला 47 जागा मिळाल्या होत्या. इथल्या जनतेचा कौल कुणाला मिळण्याची शक्यता आहे. हेच जाणून घेण्यासाठी एबीपी माझा आणि सी व्होटरनं इथंही सर्व्हेक्षण केलं. पाहुयात केरळचा ओपिनियन पोल.


केरळचा ओपिनियन पोल




  • एकूण जागा – 140

  • लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट – 83

  • युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट – 51

  • भाजप - 1

  • इतर -1


लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला 83 ते 91 दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे.
युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 47 ते 55 दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे


केरळमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती कुणाला?




  • पिनरयी विजयन (माकप) – 38.5 टक्के

  • ओमेन चंडी (काँग्रेस) – 27.0 टक्के


विद्यमान राज्य सरकारच्या कारभारावर किती लोक समाधानी आहेत?




  • खूप समाधानी – 45.35 टक्के

  • काही प्रमाणात समाधानी – 42.87 टक्के

  • असमाधानी – 11.7 टक्के


केरळमध्ये सध्या सीपीआई (एम)च्या नेतृत्वखाली लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)चे सरकार असून पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत. 2016 च्या निवडणुकीत एलडीएफला 91 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ)ला 47 जागा मिळाल्या होत्या. बहुमताचा आकडा 71 आहे.


2011 मध्ये काँग्रेस 39, मुस्लिम लीग 20, केरळ काँग्रेसने 9 जागा जिंकल्या होत्या.


2006 मध्ये सीपीएम 61, सीपीआय 17, काँग्रेस 24 आणि जनता दल सेक्युलरने 5 जागांवर विजय मिळवला होता.