West Bengal Assembly Election 2021 Full Schedule Announced: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात 8 टप्प्यात मतदान होणार असून इतर चार राज्यांसह 2 मे रोजी निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पश्चिम बंगालमध्ये 1 लाख एक हजार 916 मतदान केंद्रे उभारली जातील.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसर्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिल रोजी, तिसरा टप्पा 6 एप्रिलला, चौथा टप्पा 10 एप्रिलला, पाचवा टप्पा 17 एप्रिलला, सहावा टप्पा 22 एप्रिलला, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठव्या टप्प्यात 29 एप्रिलला मदतदान होणार आहे.
पश्चिम बंगालमधील 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागा जिंकल्या होत्या, काँग्रेस, डाव्यांना 76, भाजपला तीन आणि इतरांनी दोन जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजप सत्ताधारी टीएमसीला टक्कर देत आहे. त्याचवेळी काँग्रेस-डावे आघाडी करुन निवडणूक लढवित आहेत.
Election 2021 Dates, Full Schedule: बंगाल, केरळसह 5 राज्यात निवडणुका जाहीर
2011 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. डाव्या पक्षांच्या 34 वर्षांची सत्ता उलथवून टीएमसीने एकूण 294 जागांपैकी 194 जागा जिंकल्या होत्या.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसी आणखी मजबूत झाली. पक्षाने मागील निवडणुकीत 211 जागा जिंकल्या. बंगालमध्ये कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 148 जागांची आवश्यकता आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचं 200 जागांचे लक्ष्य
पश्चिम बंगालमध्ये आधीपासून निवडणुकीचे वारे वाहत आहे. आज निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरतील. सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी सरकार आहे. मात्र, यावेळी भाजपने 200 हून अधिक जागा आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मोठ मोठे मेळावे घेण्यात येत आहेत. याखेरीज डाव्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे बंगालचे राजकारण आणखी रंजक झाले आहे.