ABP Majha Impact : यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्रात (Yavatmal Hiwari Polling Station Video) जेवणासाठी 25 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना नोटिस बजावली असून त्यावर खुलासा करण्यास सांगितलं आहे. हिवरी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणासाठी मतदान प्रक्रिया बंद करून मतदारांना बाहेर ताटकळत ठेवलं होतं. 'एबीपी माझा'ने त्यावर वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिस बजावली होती.  


यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील हिवरी येथे मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळेत कर्मचारी हे मतदान केंद्राच्या आतच भोजनासाठी बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मतदान प्रक्रिया थांबवून त्यांनी जेवण केलं होतं. या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. 


या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 


मतदान प्रक्रियेत खंड पाडू न देण्याचे निर्देश


केंद्रावर मतदान प्रक्रियेत कोणताही खंड पाडू न देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना दिले जातात. त्यासाठी अपेक्षित अशा उपाययोजना केल्या जातात. कर्मचाऱ्यांची सोय व्हावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्थानिक शिपायाची नियुक्ती केली जाते. तसेच केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांना नाश्ता आणि जेवणासंबंधी निर्देश दिले जातात. शक्यतो एकत्रित जेवण न करता एकेकाने जेवण करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले जातात. त्यामुळे मतदानप्रक्रियेत खंड पडू नये ही अपेक्षा असते. 


यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्रात मात्र कर्मचाऱ्यांकडून हे संकेत पाळण्यात आले नाहीत. त्या केंद्रावरचे चारही कर्मचारी एकत्रित जेवताना दिसत आहेत. त्यावेळी मतदार मात्र केंद्राच्या बाहेर खोळंबल्याचं व्हिडीओत दिसतंय. त्या मतदारांमध्ये वृद्ध महिलांचाही समावेश होता.


आता या प्रकरणाची दखल ही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतली असून संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिस बजावत त्यावर खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.


राज्यात एकूण 54.34 टक्के मतदान


राज्यातील दुसऱ्या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात आलं. त्यामध्ये एकूण 54.34 टक्के मतदान झालं. 


महाराष्ट्राची एकूण टक्केवारी - 54.34 टक्के



ही बातमी वाचा: 



VIDEO Yavatmal Hiwari Voting issue : जेवणासाठी थेट मतदान केंद्रच बंद? यवतमाळच्या हिवरीमधील घटना