Thane: बंड करणारे तीन आमदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. यामधील एकाला पालक मंत्री केलं असतं तर लोकांची कामे झाली असती, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. इतकेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील बंड करणाऱ्या शिंदे गटातील तीन आमदारांच्या जागांवर भाजपचा डोळा आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे बंडखोरी करून आमचा मतदारसंघ आमच्या ताब्यात राहतो की, नाही हा साधारण प्रश्न आता बंडखोरांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले. डोंबिवलीत आयोजित पत्रकार परिषदेत तपासे बोलत होते. 


सरकारकडून हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलण्याचे आदेश काढले आहेत. याबाबत बोलताना तपासे यांनी वास्तविक वंदे मातरम असेल, जय श्रीराम असेल ही महाराष्ट्राचा देशात राज्यात  ग्रामीन भागात पूर्व काळापासून प्रचलित आहे. त्याचं राजकारण कधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं नाही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांनी कधीही राजकीय अपेक्षा ठेवल्या नाहीत, परंतु त्याच राजकारण करून आम्हीच फार मोठे देशभक्त आहोत, असं दाखवायचं काही पक्ष प्रयत्न करत असेल त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. कुठलीही गोष्ट दबावाने न करता प्रेमाने झाली पाहिजे. दबावापोटी काही न करता स्वयंस्फूर्तीने वंदे मातरम बोलले पाहिजे, असा टोला तपासे यांनी लगावला.


ठाणे जिल्ह्यातील तीन बंडखोर आमदारापैकी एकाला पालकमंत्री केलं असतं विकास झाला असता: महेश तपासे


शंभूराज देसाई यांना ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाची सूत्रे दिल्यानंतर भाजपने नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक आमदाराणा पालकमंत्रीपद द्यायला पाहिजे होते, अशी भावना व्यक्त केली जात होती. याबाबत बोलताना तपासे यांनी पालकमंत्री स्थानिक जिल्ह्यातला मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता. स्थानिक माणसाला स्थानिक प्रश्न ,लोकांची ओळख असते यामध्ये काही दुमत नाही परंतु एकंदरीत  मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असले तरी त्यांचा मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातलं आहे आणि शंभूराजे देसाई हे देखील सातारा जिल्ह्याचेच असल्यामुळे कदाचित आपल्या गावचा एक सहकारी म्हणून त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सूत्र त्यांच्याकडे दिली असेल. दुःख एकच वाटतं बंड करण्यामध्ये ठाणे जिल्ह्याचे तीन आमदार आहेत त्यात प्रताप सरनाईक आहेत, विश्वनाथ भोईर, बालाजी किनीकर आहेत. यांच्यापैकी एकाला कोणाला मंत्री म्हणून जबाबदारी दिली असती तर कल्याण डोंबिवलीच्या पंचक्रोशीचा देखील चांगला विकास झाला असता असा, टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.


शिवसेनेचे बंडखोरी करून आमचा मतदारसंघ आमच्या ताब्यात राहतो की नाही हा बंडखोर आमदारांना प्रश्न - महेश तपासे


सरनाईक यांच्या मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा रंगली होती. याबाबत तपासे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. याबाबत बोलताना तपासे यांनी भाजपा हा शिंदे गटाचा राजकीय उपयोग करून घेत आहे. हे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माहित आहे. ज्यांनी बंद केलं तर 40 पैकी बहुसंख्या आमदारांना माहिती आहे की, पुढच्या वेळेला आम्हाला काही ना काही त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. भाजपाचा डोळा ठाणे जिल्ह्यातील माजी वाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांवर आहे. त्यामुळे काल आमदार प्रताप सरनाईक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. इडीच्या तपासाचा क्लोजर रिपोर्ट प्रताप सरनाईक यांच्या संदर्भातील दाखल झाला होता, तो परत उघडकीस आणला जातो की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिम मध्ये नरेंद्र पवार भाजपचे माजी आमदार यांना पूर्णपणे भाजपने पाठबळ दिलेला आहे. त्यामुळे विद्यमान बंडखोर आमदार विश्वनाथ भोईर यांचा काय होणार शिवसेनेचे बंडखोरी करून आमचा मतदारसंघ आमच्या ताब्यात राहतो की, नाही हा साधारण प्रश्न आता बंडखोरांच्या मनात निर्माण झाला आहे.