Abhijeet Patil in Madha Loksabha : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी शुक्रवारी (दि.3) भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान, भाजपात प्रवेश करताच अभिजीत पाटील कामाला लागले आहेत. त्यांनी मोहिते पाटलांविरोधात भाजपचा विजय होण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. 


गावोगावी घोंगडी बैठका


अभिजीत पाटलांनी माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात भाजपसाठी रात्री उशीरापर्यंत काम करण्यास सुरुवात केली आहे.  त्यांनी गावोगावी घोंगडी बैठका सुरु केल्या आहेत. तुतारीकडून कमळाकडे बदललेल्या भूमिकेला कार्यकर्त्यांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. 5 मे रोजी माढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन देखील होणार आहे. 


काही दिवसांपूर्वी मोहिते पाटलांचा प्रचार 


अभिजीत पाटील (Abhijeet Patil) काही दिवसांपूर्वी मोहिते पाटलांचा प्रचार करत होते. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यामुळे मलाच आमदार झाल्यासारखे वाटू लागले आहे, असं अभिजीत पाटलांनी म्हटलं होतं. मात्र, अभिजीत पाटील कारखान्यामुळे अडचणीत आले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यात फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने पाटील यांनी माढ्यात रणजित निंबाळकरांना पाठिंबा देत भाजपचा प्रचार सुरु केला. 


प्रशासनाने विठ्ठल सहकारी कारखान्याला लावलेलं सील काढलं 


प्रशासनाने अभिजीत पाटलांच्या (Abhijeet Patil) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सीलं लावलं होतं. मात्र, अभिजीत पाटलांनी भाजपात प्रवेश करताच कारखान्याला लावलेलं सील काढण्यास सुरुवात केली आहे. अभिजित पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा देत फडणवीस यांना निमंत्रण दिले होते. आता कारखान्याची जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. 5 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता अभिजित पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाह म्हणाले सावरकरांवर बोला, उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या राजकीय बापाने इंग्रजांना पाठिंबा...