Akola Loksabha, Abhay Patil : काँग्रेस पक्षाने आज (दि. 1) दोन लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेस पक्षाने अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्राशिवाय तेलंगणातील एक उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, अकोल्यातून अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या वंचितसोबतच्या युतीचे काय होणार? या बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


कोण आहेत अभय पाटील? (who is Dr. Abhay Patil?)


डॉ. अभय काशिनाथ पाटील हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. M.B.B.S. Orthopedic Surgeon असा त्याचा शैक्षणिक प्रवास आहे. गेल्या 30 वर्षापासून अकोल्यात ऑर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. अकोल्यातील विघ्नहर्ता क्रिटीकल केअरचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय ते आयकॉन हॉस्पिटलच्या व्यवस्थापकी संचालकपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. राजकीय जबाबदारीचा विचार केला तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते जनरल सेक्रेटरी होते. 


अभय पाटील यांची कारकिर्द कशी आहे? कोणते उपक्रम राबवले?


अभय पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत 50 हजार शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. एम.आर.आय. सेंटरचे व्यवस्थपकी संचालक व लायेंन्स क्लॅबचे माजी अध्यक्ष आहेत. अकोला आणि वाशिममध्ये मराठा क्रांती मोर्चा संयोजन त्यांनी केले आहे. 150 खाटांचे मल्टी स्पेशालिटी ऑयकॉन हॉस्पिटल सुरु केले. दरवर्षी भगतसिंग जयंतीला त्यांच्याकडून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. 1000 ते 1200 बॉटल्यांची व्यवस्था केली जाते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने देतात. सालासर बालाजी मंदीर व गणेश चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापकी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अकोला जिल्ह्यात पासपोर्ट शिबिर तयार केले. लायब्ररी आणि पुस्तकांचे वितरण त्यांनी केले होते. 


गुन्हेगारांच्या पुनर्वसनावर त्यांनी काम केलय.  अकोला वेद आणि संस्कार स्कूलचे संस्थापक सदस्य आहेत. वाशिम जिल्ह्यातील अनेक मंदिरे, सोनखास, पंधरा जीम आखाडा आणि संस्कार केंद्राचे व्यवस्थापन केले. सुमारे 10 ते 15 हजार तरुणांची शिवजसंती आणि संभाजी महाराज जयंती आयोजित केली. बाळापूर व सोनखास येथे ग्रामीण भागत शिक्षणाच्या प्रेरणेसाठी शाळा स्थापना केल्या. रंग पिकर्ससाठी शाळा चालवल्या. मेडिकल चॅम्प आयोजित केले आणि रोजगार शिबिर आयोजित केले आहेत. 


उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले अभय पाटील? 


उमेदवारी मिळाल्यानंतर अभय पाटील म्हणाले,  लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. काल जिथे मिटींग घेतल्या तिथे मिटिंगचे रुपांतर सभेत झाले. लोकांचा प्रचंड उत्साह आहे. लोकांना वाटतय की, 20 वर्षांनंतर चांगला चेहरा मिळालाय. पर्याय लोकांना भेटलाय. निश्चित त्याचा फरक जनतेवर पडेल. यावेळी आम्हाला आत्मविश्वास आहे. काँग्रेसचा मतदारसंघात खूप मोठा बेस आहे. अडीच ते तीन लाखांचा मतदारांचा बेस आहे. मोदी लाटेतही कमी-जास्त झालेला नाही. तो निश्चित या वेळेस वाढेल. शिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद आमच्यासोबत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Bhavana Gawali: फडणवीसांच्या घरात जाताना उत्साहात, पण भेटीनंतर भावना गवळींचा नूरच बदलला, यवतमाळमधून पत्ता कट?