Abdul Sattar on Manoj Jarange : "जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांची आहे. एक महिना आहे , आमचा प्रश्न सोडवा असं देखील जरांगे म्हणाले. आमचे काही कार्यकर्ते अचानक आले, कोणताही निवडणूक विषय नव्हता. भेटीसाठी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून गेलो होतो. सरकारमध्ये मी मंत्री आहे. जरांगे समाजाची लढाई लढत आहेत. मी देखील 30 दिवस मराठा समाजासाठी उपोषण केले होते. मुस्लिम आणि मराठ्यांना एकत्र यावं ही जरांगेंची इच्छा आहे", असं मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. त्यानंतर या भेटीबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. 


शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची जरांगे यांची मागणी 


अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची जरांगे यांची मागणी आहे. मराठा आरक्षणासाठी तुमच्याकडे एक महिना आहे  निर्णय घ्या म्हणाले. शिवाजी महाराजांनी मशीदीला विरोध केला नसेल तर माझा देखील मुस्लिम समाजाला विरोध नाही. मला नाईलाजाने राजकारणात यावं लागेल. त्यांनी मला सांगितले एकत्र आले पाहिजे पण शिवसेनाचा मी कार्यकर्ता आहे. आपण एकत्र यावे त्यानं वाटले, पण मी  शिवसेनाचा आणि शिंदे यांचा कार्यकर्ते आहे.


पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे भावना कळवा असे ते म्हणाले. पर्याय आहे, जरांगे जे बोलतात ते करतात. मी त्यांना सांगितले काही मार्ग काढा. आरक्षण द्या. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर पुन्हा जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत.


मराठा अधिकाऱ्यांच्या पाठीमागे तुम्ही ताकतीने उभं राहा 


मनोज जरांगे म्हणाले, आपल्या अधिकाऱ्यांना म्हणजे मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना त्रास दिला जातो. मराठा अधिकाऱ्यांच्या पाठीमागे तुम्ही ताकतीने उभं राहा. उभा करायचा का पाडायचे ही बैठक आपण निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेणार आहोत. पण जर उमेदवार द्यायचं ठरलं तर एकच उमेदवार देणार पण तुम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. उमेदवार द्यायचा ठरला तरी माझा मराठा पराभूत होणार नाही, याची काळजी घ्या आपल्या समाजाचा हसू होऊ देऊ नका. जसा तुम्ही ताकतीने पाडलं तसा आता ताकत लावून निवडून आणा, असंही जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ladki Bahin Yojna: आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा