Aaditya Thackeray at Majha Vision :  माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याबाबत गेल्या महिन्याभरात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय सेक्स रॅकेट आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपांची मालिकाच प्रज्वल रेवण्णा यांच्यावर सुरु आहे. दरम्यान,प्रज्वल रेवण्णा यांना उमेदवारी दिल्याने आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्याने भाजपला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात घेतलेल्या सभेत प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरुन जोरदार टीका केली होती. शिवाय, 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर रेवण्णाची जबाबदारी पीएम मोदींच्या गळ्यात बांधणार, असंही ठाकरेंनी (Aaditya Thackeray) म्हटलं होतं. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दक्षिण मुंबईतही प्रज्वल रेवण्णा आहे. दक्षिण मध्य मुंबईमधील प्रज्ज्वल रेवण्णा तुमच्या बाजूला उभे राहणार की नाही? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे. 


आदित्य ठाकरे काय म्हणाले?


आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी 'एबीपी माझा'च्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत्या अनुषंगाने मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी दक्षिण मध्य मुंबईमध्येही प्रज्ज्वल रेवण्णा आहेत, असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रज्ज्वल रेवण्णाच्या बाजूला उभे राहतात. त्यांच्या तपास यंत्रणा आमच्यावर नजर ठेवतात. त्यांना रेवण्णाने बलात्कार केले आहेत, याची माहिती नव्हती का? यांना दक्षिण मध्य मुंबईमधील रेवण्णाविषयी माहिती नाहीये का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. 


राहुल शेवाळेंना दक्षिण मध्य मुंबईमधून महायुतीची उमेदवारी 


दक्षिण मध्य मुंबईमधून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी रेवण्णावरुन केलेला आरोप राहुल शेवाळेंवरच केला आहे का? असा सवाल उपस्थितीत केला जातोय. राहुल शेवाळेंविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे. यापूर्वी राहुल शेवाळे दोन वेळेस या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निवडून येण्याचे आव्हान राहुल शेवाळे यांच्यासमोर असणार आहे. 




इतर महत्वाच्या बातम्या 


मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर केल्याचा अंबादास दानवेंचा आरोप, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी