Aaditya Thackeray on Mahendra Thorve : "टेबलावर नाचणारे आहेत, ज्या परिस्थितीत जे नाचले ते पाहा. त्यावेळेसचे त्यांच्या चेहऱ्यावरचे हाव-भाव पाहा. त्यांची तेव्हा मनस्थिती काय होती? हे मला माहिती नाही. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. जो निकाल द्यायचाय ते इकडचे स्थानिक लोक देणार आहेत. डाग अच्छे है, म्हणून भाजपवाले अनेकांना क्निलचीट देतात, प्रवेश देतात. पण डाग कधीच चांगले नसतात. लोक हे डाग बरोबर धुतील", असे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. कर्जतमध्ये आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 


शंकराचार्य काल म्हणाले सगळ्यात मोठा विश्वासघात झाला


आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही लढलात ते पाहाता तुम्ही जिंकलेले आहात. सगळ्यांचे आभार मानायला मी येथे आलोय. उद्धव ठाकरेंनी आज मला येथे पाठवले. जेव्हा गद्दारी झाली तेव्हा कोण आपल्या सोबत आहे हे कळत नव्हतं. सुरतवरून गुवाहाटीला मिंधे पळत होते, तेव्हा आपली येथे सभा झाली होती. शंकराचार्य यांचं दर्शन घेतलं, आज जनतेचा दर्शन घेतोय. हीच वारी आपली आहे. शंकराचार्य काल म्हणाले सगळ्यात मोठा विश्वासघात झाला. विश्वासघात सगळ्यात मोठं पाप आहे. त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे. आता या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. एक टप्पा आपण पूर्ण केलाय. आपण एक लढाई जिंकली आहे. कारण मोदी सरकार, भाजप सरकार म्हणणारे आता NDA सरकार म्हणताय.  परिवर्तन घडलंय आणि संविधान वाचविण्यासाठी आपण भाजपला थांबवलं, याच मी अभिनंदन करतो. केंद्रात 242 भाजप जागा आहेत. केंद्रात कधी ही खेळ घडू शकतो आणि कधीही इंडिया आघाडीचा सरकार येऊ शकते. 


महापलिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाही, यांचा पराभव होण्याची भीती 


पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महापलिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाही, यांचा पराभव होण्याची भीती आहे. मोठा पक्ष म्हणून भाजप स्वतःला म्हणताय.  ईडी, पोलीस, इलक्ट्रोल बॉण्ड सगळ्यात जास्त त्यांच्याकडे, यंत्रणा त्यांच्याकडे ते म्हणत आहेत मोठा पक्ष मग एवढा मोठा पक्ष असून 9 जागा फक्त राज्यात आल्या.  आपला पक्ष फोडला तरी आपण 9 जागा आणल्या. आता सांगा मोठा पक्ष कोणाचा? महाराष्ट्राचे हाल यांनी केले आहेत. परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. कर्जतमध्ये 50 हजारचा लीड घेऊन जिंकायचं आहे. येथे लागलेली गद्दारांची कीड आपल्याला येथून काढून टाकायची आहे.  सरकार आपल्याला पुन्हा आणायचा आहे. सगळे उद्धव साहेबांना भेटतात तेंव्हा ते म्हणतात आम्ही मतं तुम्हाला दिली आहेत. सावध राहून लढावं लागेल.  या खोट्या अफवा पसरवताय हा आमच्यासोबत येणार तो आमच्यासोबत आहे म्हणत आहेत. काही काम केलं नाही आपल्याला कॉन्ट्रॅकर मित्रासाठी हे काम करत आहेत. महाराष्ट्राला लुटण्याचा काम सुरु आहे. वेदांता फोक्सकॉन पेक्षा मोठा प्रोजेक्ट येणार मुख्यमंत्री म्हणाले होते, आला का मोठा प्रोजेक्ट? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar : सगे सोयरे ही भेसळ आहे, घाई घाईत काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, प्रकाश आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे