Chhatrapati Sambhajinagar: मशीद पाडण्यासाठी जे काही चुकीचं झालं असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चुकीची नाही म्हणत अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विशाळगडाबाबत (Vishalgad) मशीदीचे जे नुकसान झाले आहे त्याचा तपास करण्यासाठी वक्फ बोर्डााचे सीईओ आणि आयुक्त जातील. सर्व कागदपत्रे तपासून सर्व परिस्थिती समोर येईल, असे सांगितले.


यासह विशाळगड प्रकरणी संभाजीराजे व इम्तियाज जलील या दोघांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची काळजी घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.


विशाळगडप्रकरणी भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या


विशाळगडप्रकरणी संभाजीराजे असो की इम्तियाज जलील असो दोघांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.


यावेळी अल्पसंख्यांक समाजाची छोटी छोटी मंदिरे सुरक्षित राहिली पाहिजेत. जर मंदिर पाडण्यात आले तर माझी भूमिका स्पष्टपणे मंदिराच्या बाजूने असते. त्यामुळे विशाळगडावर कोणाच्या भावना दुखावणार नाही याची संभाजीराजे आणि जलील या दोघांनी काळजी घेतली पाहिजे असे अब्दुल सत्तार म्हणाले.


मशीदीचे नुकसान तपासण्यासाठी जाणार वक्फ बोर्ड


विशालगड प्रकरणात मशीदीचे झालेले नुकसान तपासण्यासाठी वक्फ बोर्डाचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जातील. सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर सर्व परिस्थिती समोर येईल असे अल्पसंख्यांकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.


या प्रकरणात जखमींची जखम महंतांनी पाहिली आहे का? असे विचारत जखमांसाठी डॉक्टर असतो. जखम झाल्यावर टाके दिले पाहिजे त्यांच्याकडे असतील तर टाके द्यावे.असे सत्तार म्हणाले.


विशाळगडावर झालेल्या घटनेची चौकशी सरकार करणार


विशालगडावर झालेल्या घटनेची चौकशी सरकार करणार आहे. तसेच यासाठी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.


मी एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी कोणत्याही पक्षाचा विचार करणार नाही. त्यांचा पूर्ण विश्वास आहे. मी काही जुना शिवसैनिक नाही, मी काही पक्ष स्थापनेपासून सोबत नाही. मी प्रासंगिक कराराने आलेला कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे साहेबांमुळे शिवसेना जॉइन केली. 


मराठा ओबीसी दोघांची लढाई हक्कासाठी


मराठा बांधव सर्वात मोठा भाऊ आहे. मराठा समाजासाठी जरांगे लढाई लढत आहे आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. ओबीसी यांना देखील देखील वाटते आपला हक्क कुणाकडे जाऊ नयेत, हक्काच्या लढाईसाठी लढत आहे. दोघांची लढाई  हक्कासाठी आहे. त्यामुळे दोघांना हक्क देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. असे अल्पसंख्यांकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.


अब्दुल सत्तारांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण


आमचे मंत्री असेल नसेल त्यावर मला काही बोलायचं नाही. मुख्यमंत्री यांना जे कळतं ते इतर कुणाला कळत नाही. त्यांना सर्व कळते म्हणून 18 ते 15 तास ते म्हणाले काम करतात. परंतु त्यांच्या बद्दल जे कुणी बोलले असतील त्यांनाच काही कळत नाही. ते कुणी असो मग. असं म्हणत मुख्यमंत्री यांच्याबद्दल कुणीही बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपवून घेणार नाही, असं म्हणत त्यांनी भूजबळांवर निशाणा साधलाय.


हेही वाचा:


Vishalgad: शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला