MHA Banned WhatsApp Groups: देशभरात अग्निपथ (Agnipath Scheme) योजनेबाबत सुरू असलेल्या गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. अग्निपथ योजना आणि अग्निवीरांवर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) आज 35 व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर (WhatsApp Groups)  बंदी घातल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. या प्रकरणी यापूर्वी बिहारमधील पाटणाच्या चार कोचिंग सेंटरवर कटाचा आरोप करण्यात आला होता.


अग्निपथ योजनेविरुद्ध निषेधा दरम्यान पाटणा पोलिसांना व्हॉट्सअॅप चॅट्समधून अनेक पुरावे सापडले आहेत. ज्यातून विद्यार्थ्यांना भडकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जाळपोळ आणि हिंसाचाराला खतपाणी घालण्यात राज्यातील कोचिंग सेंटरची भूमिका असू शकते, असे पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून सांगण्यात येत आहे. पाटणा जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत 4 कोचिंग इन्स्टिट्यूटवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांमधूनही अशाच काही गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. दरम्यान, अग्निपथ योजना आणि अग्निवीरवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 35 व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर गृह मंत्रालयाने आज बंदी घातली आहे.


दरम्यान, सशस्त्र दलात भरतीसाठी अग्निपथ योजनेच्या विरोधात देशाच्या विविध भागांत आंदोलने होत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले आणि गाड्या पेटवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या योजनेबाबत तिन्ही लष्कराच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली. ज्यामध्ये अग्निपथ योजना मागे घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच आता या योजनेअंतर्गत सैन्य भरती होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Presidential Election: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 21 जूनला विरोधी पक्षांची बैठक, ममता बॅनर्जी राहणार गैरहजर
SSC 10th Result 2022 : "इच्छा तेथे मार्ग"! BMC मधील सफाई कर्मचाऱ्याने वयाच्या 50 व्या वर्षी दहावीची परीक्षा देऊन मिळविले 57.40 टक्के
Kailash Vijayvargiya on Agnipath : भाजप कार्यालयाच्या बाहेर 'सिक्योरिटी गार्ड' नेमायचे असल्यास 'अग्नीवीर'ना प्राधान्य, भाजप नेत्याची ऑफर