(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pisces Horoscope Today 10th March 2023 : मीन राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, आत्मविश्वासही वाढेल; वाचा आजचं राशीभविष्य
Pisces Horoscope Today 10th March 2023 : आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने परिपूर्ण असा असेल. तुमची सर्व कामे आज वेळेवर पूर्ण होतील.
Pisces Horoscope Today 10th March 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. सर्व क्षेत्रांतून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत प्रगती झाल्यानंतर नोकरदार लोक खूप आनंदी दिसतील. पदामध्येही बढती होणार आहे. पैसे येण्याचे संकेत आहेत. कुटुंबात काही तणाव संभवतो. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. दिलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील.
आत्मविश्वासाने परिपूर्ण असा आजचा दिवस
आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने परिपूर्ण असा असेल. तुमची सर्व कामे आज वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक सामाजिक क्षेत्रात आहेत त्यांचा सन्मान वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही आज छान वेळ घालवाल.
योगसाधनेला महत्त्व द्या
आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठीही चांगला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठही तुम्हाला मदत करतील. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांच्याकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासात खूप रस घेऊन अभ्यास करताना दिसतील. कौटुंबिक जीवनातील तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहिल. योगसाधनेला महत्त्व द्या.
आजचे मीन राशीचे आरोग्य :
पाठदुखीच्या तक्रारी दिसून येतील. भुजंगासन केल्याने खूप फायदा होईल.
मीन राशीसाठी आजचे उपाय :
कपाळावर पिवळे तिलक लावून हळदीचे दूध सेवन केल्यास खूप फायदा होईल.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :