Pune International Film Festival : 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Pune International Film Festival) येत्या 2 ते 9 फेब्रुवारी दम्यान पार पडणार आहे. या महोत्सवातील 21 वा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी सिनेमांची यादी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली आहे.
स्पर्धात्मक विभागात निवड झालेले मराठी सिनेमे पुढीलप्रमाणे -
- मदार (दिग्दर्शक - मंगेश बदार)
- ग्लोबल आडगांव (दिग्दर्शक - अनिल कुमार साळवे)
- गिरकी (दिग्दर्शक - कविता दातीर आणि अमित सोनावणे)
- टेरेटरी (दिग्दर्शक - सचिन मुल्लेम्वार)
- डायरी ऑफ विनायक पंडित (दिग्दर्शक - मयूर शाम करंबळीकर)
- धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे (दिग्दर्शक - प्रवीण तरडे)
- पंचक (दिग्दर्शक - जयंत जठार आणि राहुल आवटे)
'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' अली अब्बासी दिग्दर्शित 'होली स्पायडर' या सिनेमाची 'ओपनिंग फिल्म' म्हणून तर मिशेल हाजानाविसियस दिग्दर्शित 'फायनल कट' हा सिनेमा 'क्लोजिंग फिल्म' म्हणून दाखविण्यात येणार आहे. विद्या बालन, जॉनी लिव्हर असे अनेक दिग्गज यंदाच्या महोत्सवात विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल डॉ. जब्बार पटेल म्हणाले,"आजादी का अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय पण 75 वर्षात देश बदलत गेला आणि त्याचा साक्षीदार सिनेमा होता. त्यामुळे यावर्षी आम्ही देखील ही संकल्पना ठरवली आहे. देश बदलत गेला तसे सिनेमे बदलत गेले आणि हे बदल दाखवणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांना 'पिफ'मध्ये (PIFF) बघायला मिळतील.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे पार पडणार?
सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय अशा तीन ठिकाणी एकूण नऊ स्क्रिनवर चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवात एक भारतीय आणि दोन इतर देशांतील मंडळी ज्युरीमध्ये असतील. सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये 800 असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी 600 रुपये असणार आहे.
संबंधित बातम्या