Sacred Games या लोकप्रिय वेबसिरीजचा दुसरा सीजन 15 ऑगस्टला ऑनलाईन प्रदर्शित झाला आहे. हा सीजन चाहत्यांना आवडला की नाही याबद्दल सध्या वेगवेगळे रिव्ह्यू येत असले तरी यातील काही डायलॉगने मात्र सोशल मीडीयावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या वेब सिरीज मधील 'बंटी' या कॅरेक्टरचा 'पारले-जी' वाला डायलॉग अनेक मीम्सच्या रुपात सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे या सगळ्यात पारले-जी, स्विगी आणि नेटफ्लिक्स या कंपन्यांनी देखील उडी घेतली आहे.


'सेक्रेड गेम्स 2' मधील एका एपीसोड मध्ये गणेश गायतोंडे, बंटी आणि कांताबाई यांच्यात संभाषण सुरु असतानाचा बंटीचा "यहा पारले जी खाना पड रहा है, काली चाय मे डुबोकर", असा एक डायलॉग आहे. हा डायलॉग बराच लोकप्रिय झाला आहे. काहींनी तर याला नोकरी करणाऱ्यांची दर महिन्याच्या शेवटी काय अवस्था असते? अशा आशयाचे मीम्स बनवून शेअर केले आहे. तर काहींनी 'पारले-जी'च्या पाकीटावरील लहान मुलीच्या फोटोजागी बंटीचा फोटो लावून मीम्स तयार केले आहेत.

पारले-जी या कंपनीने देखील याची दखल घेत ट्विट केले आहे. 'प्रत्येक कलाकाराच्या सुरुवातीच्या दिवसातील संघर्षाचा भाग असल्याचा Parle-G ला अभिमान आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे.


पारले-जीच्या ट्विटला नेटफ्लिक्सने देखील दाद दिली आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिजनमध्ये पारले-जीचा उल्लेख केल्याने बंटी कसा लोकप्रिय झाला असं ट्विट नेटफ्लिक्सने केलं आहे.


नेटफ्लिक्स आणि पारले-जीच्या या संवादात उडी घेतली.


स्विगीच्या या ट्विटवर नेटफ्लिक्सने 'महिन्याचा शेवट सुरु आहे, कृपया 'काली चाय' पाठवा', असा रिप्लाय केला.


त्यावर स्विगीने पुन्हा ट्विट करत मंथ एन्ड असला तर काय झालं आमच्याकडे बरेच डिस्काउंट्स आहेत. दुधवाली चाय का बलिदान नही देना होगा असं ट्विट केलं आहे.