Parbhani : राज्यात गणेश विसर्जन उत्साहात सुरू असताना परभणीत मात्र डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. दोघांना प्रकृती गंभीर झाल्याने जिंतुरहून परभणीला हलवण्यात आले आहे. परभणीच्या जिंतुर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी हा प्रकार घडलाय. 


दोघांची प्रकृती गंभीर, उपचारांसाठी परभणीला हलवले 


अधिकची माहिती अशी की, श्री राजा शिवछत्रपती गणेश मंडळाची मिरवणूक शिवाजी चौकात आली होती. त्यावेळी जोरदार सुरू असलेल्या डीजेमुळे संदीप कदम यांच्या मृत्यू झाला.  तर  शिवाजी कदम आणि शुभम कदम हे 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवरही जिंतुर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना परभणीकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले  आहे.  सध्या जिंतुर ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तरुण जमले आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या घटनेनंतर सुरु असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोचला असून परभणीतही पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुख्य सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली होती. काही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सजीव देखावे सादर केले आहेत, तर राजे संभाजी मित्र मंडळाने आदिवासी नृत्याचा देखावा केलाय. दुसरीकडे मानाचा मोठा मारुती संस्थानच्या ही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय. त्या पाठोपाठ इतर मंडळांच्या मिरवणुका सुरु आहेत. बालाजी गणेश मंडळाने राजस्थानच्या खातून बाबांचा देखावा परभणीकरांसमोर आणलाय तर सिंधी गणेश मंडळांने ही बैलगाडीत गणरायाची मिरवणूक काढलीय. या सर्व मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात शिवाजी चौकात या मिरवणुकांचा समारोप होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच