Parbhani Farmer Suicide News : शेतकरी आत्महत्येचं (Farmer Suicide) सत्र काही केल्या थांबत नाही. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या दोन दिवसात परभणी (Parbhani) जिल्ह्यातील मानोलीमध्ये (Manoli) दोन आत्महत्या झाल्या आहेत. घरची आर्थिक परिस्थिती आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर याला कंटाळून 21 वर्षीय तरुणासह 52 शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.


डोक्यावर कर्जाचा डोंगर 


परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन जणांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक परिस्थिती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली येथील 21 वर्षीय युवक रवी सखाराम काकडे यांनी बुधुवारी (14 डिसेंबर) आत्महत्या केली होती. तर आज 52 वर्षीय ज्ञानोबा ग्यानदेवराव भांड या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. घरची आर्थिक परिस्थिती आणि डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर यामुळंच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. 


घरची परिस्थिती हालाकिची असल्यानं उचललं टोकाचं पाऊल


मानोलीतील सखाराम काकडे हे वयाच्या पंधरा वर्षापासून बाहेर मजुरी करुन उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना रवी आणि त्रिवेणी हे दोन मुले आहेत. त्यातच त्रिवेणीला आजार असल्यानं तिच्यावर मागील दहा वर्षापासून मुंबई येथे उपचार सुरु आहेत. अशातच घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांचा मुलगा रवी काकडे मागील तीन दिवसापासून चप्पल घेण्यासाठी पैसे मागत होता. मात्र, त्याला पैसे मिळाले नाहीत. घरची परिस्थिती हलाकीची असल्यानं त्याने शेवटी परिस्थितीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


मानोली गावावर शोककळा


दुसरीकडे मानोली  गावातील 52 वर्षीय शेतमजूर ज्ञानोबा भांड यांना तीन एकर जमीन आहे. मात्र ते दुसऱ्या शेतकऱ्याकडे मजुरी करतात. त्यांच्यावरही कर्ज आहे. शिवाय परिस्थिती वाईट असल्यानं त्यांनीही आज शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनेने मानोली गावावर शोककळा पसरली आहे. 


मराठवाड्यात आत्महत्येचं सत्र


मराठवाड्यात शेती पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा यासह इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या पाच महिन्याच्या काळात मराठवाड्यातील 475 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यातच मराठवाड्यातील तब्बल 939 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली आहे. तर गतवर्षाअखेर ही आकडेवारी 887 एवढी होती. परंतू हा आकडा यंदा नोव्हेंबरमध्येच पार झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


शिंदे-फडणवीस सरकारच्या पाच महिन्याच्या काळात मराठवाड्यातील 475 शेतकऱ्यांची आत्महत्या