Parbhani Crime News : किरकोळ वादातून मनसेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा खुन झाल्याची घटना 5  सप्टेंबरला समोर आली होती. या घटनेला आज पाच दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपी विजय जाधव हा फरार असुन, पोलिसांचे 3 पथक विजय जाधव याच्या मागावर आहेत. परंतु सातत्याने विजय जाधव हा पोलिसांना गुंगारा देत असल्याने, तो हाती लागत नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिलीय.


परभणी शहरातील शिवराम नगर येथील गिरीश रेवले यांच्या घरी 5 सप्टेंबर रोजी कुणीही नसल्याने मयत सचिन पाटील, आरोपी विजय जाधव यांच्यासह काही मित्र रम्मी खेळत होते. यावेळी रात्री उशिरा विजय जाधव आणि सचिन पाटील यांच्यात आपल्यापैकी कोण मोठा यावरून वाद झाला. शुल्लक कारणावरून झालेला हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, विजय जाधव याने त्याच्या गाडीतील चाकु काढून सचिन पाटील यांच्या मानेवर, पाठीवर वार केले.


खुनाचा गुन्हा दाखल...


विजय जाधवने केलेल्या हल्ल्यात सचिन पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या इतर मित्रांनी आणि मोठे भाऊ संदीप पाटील यांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहचेपर्यंत सचिन पाटील यांचा मृत्यू झाला होता. तर या प्रकरणी सचिन पाटील यांचे मोठे भाऊ संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय जाधव याच्यावर शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात 6 सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले असुन, आरोपी विजय जाधव हा पोलिसांना सापडत नाही. जाधव हा सतत आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नाही. विशेष म्हणजे पोलिसांचे तीन पथक जाधव याचा शोध घेत आहे. पण जाधव सतत पोलिसांना गुंगारा देत आहे. 


शुल्लक कारण आणि जीव गेला...


मयत सचिन पाटील, आरोपी विजय जाधव हे रम्मी खेळत होते. दोन्ही एकमेकांना चांगले ओळखायचे. मात्र रम्मी खेळत असतानाच अचानक दोघांमध्ये आपल्यापैकी कोण मोठा आहे यावरून चर्चा सुरु झाली. दोघेही मीच मोठा असा दावा करू लागले. त्यामुळे पाहता-पाहता वाद विकोपाला गेला. वाद एवढा वाढला की,  जाधवने थेट चाकूने सचिन पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे शुल्लक कारणावरून पाटील यांना जीव गमवावे लागले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Parbhani Crime News : किरकोळ वादातून मनसे शहराध्यक्षाची हत्या; मित्रानेच हत्या केल्याचा आरोप


Parbhani Crime : 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण; निषेध म्हणून सेलु बंदची हाक, सामाजिक संघटनाचा मोर्चा