Parbhani: ग्रामीण भागात आजही रस्त्यांची अवस्था अंत्यत वाईट असून, गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. लोकप्रतिनिधी फक्त निवडणूकीत येतात आणि आश्वासने देऊन निघून जातात. त्यामुळे आपल्या व्यथा कुणाजवळ मांडाव्यात असा प्रश्न गावकऱ्यांना पडत असतो. मात्र परभणीतील एका गावात आमदार कार्यक्रमासाठी गावात येताच गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. तर संतप झालेल्या गावकऱ्यांनी या आमदार महोदयांना खडेबोल सुनावत चांगलाच समाचार घेतला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. 


ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सर्वश्रूत आहे. मात्र यावर बहुतांश लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांचा संताप आता अनावर होताना पाहायला मिळत आहे. परभणीच्या पाथरीमध्ये एका गावकऱ्यांनी तर चक्क आमदारांसमोरच गावाची व्यथा मांडत खडे बोल सुनावले आहेत. परभणीच्या पाथरी तालुक्यातील डोंगरगाव येथे गावाला जोडणारा तीन किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब आहे.  याबाबत अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याबाबत मागणी करत नागरिकांनी आंदोलन केली.  मात्र याचा उपयोग झाला नाही.


व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


गावाला रस्ता नसल्याने निवडणुकीवरही या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. मात्र तरीही रस्ता काही झाला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी पाथरी मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर हे डोंगरगाव येथे कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम सुरू असतानाच गावातील एका गावकऱ्याने भर सभेत उभे राहून रस्त्याच्या प्रश्न उपस्थित केला. रस्त्याची व्यथा मांडत त्याने वरपूडकर खडेबोल सुनावले. रस्त्यामुळे बैलांना 5 ऐवजी 10 चाबूक मारावे लागत आहेत. गावातील मुलांना कुणी मुलगी देत नाही. गावात किती खासदार, आमदार आले, मात्र रास्ता केला नाही. अशी संतप्त भावना त्याने आमदार वरपूडकर यांच्यासमोर मांडली. दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


गावकऱ्यांच्या संताप 


परभणीच्या पाथरी तालुक्यातील डोंगरगाव हे तीन ते साडेतीन हजार लोक वस्तीचे गाव आहे. मागील काही वर्षांपासून डोंगरगावात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे गावात ना बस जाते, ना जनावरांना जाण्यासाठी रस्ता आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात गावकऱ्यांचे प्रचंड हाल होतात. रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले, शासन दरबारी निवेदन सुद्धा दिले, पण रस्ता काही झाला नाही. दरम्यान आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने नेतेमंडळी गावात जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत थेट आमदारांना खडेबोल सुनावले. गावकऱ्यांचा संताप पाहता आमदारांनी सुद्धा गुपचूप आयकून घेतले.


महत्वाच्या बातम्या...


Thackeray Vs Shinde : शिंदे गट धक्का देण्याच्या तयारीत, दसरा मेळाव्याला ठाकरे गटातील शिवसेना नेते, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात?


माझ्या सांगण्यावरुन शिंदेंनी पोलिसाची नोकरी सोडली, त्यांना तिकीट देऊ शकलो नाही तेव्हा डोळ्यात पाणी आलं : शरद पवार