Sharad Pawar on Sushilkumar shindeराष्ट्रवादीचे नेते शरद पवार (NCP Sharad Pawar)आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण वाचले असतील. दोघांची मैत्री राजकारणाच्या पलिकडची आहे. त्यांच्या मैत्रीसंदर्भातच आज शरद पवारांनी एक किस्सा सांगितला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी म्हटलं की, सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या सांगण्यावरुन पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले. पण तिकीट मिळवून देऊ शकलो नाही, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, असं ते म्हणाले. मी त्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपल्या ज्या काही केसेस असतील तर त्या शिंदेंना द्यायचे ठरले. पुढे त्यापुढील निवडणुकीत शिंदेंना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही, असंही शरद पवार म्हणाले.


पुणे नवरात्र महोत्सवात (Pune Navratri Utsav 2022) दरवर्षी दिला जाणारा 'महर्षी' पुरस्कार यंदा सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


'पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत'


शरद पवार म्हणाले की, पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे लोक ठराविकच असतात. रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार ही नावे पुरस्कार मिळवणार्‍या लोकांमध्ये असतातच. पुरस्कार ठरवणारे देखील उल्हास पवार, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला हे लोक असतात.


राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी


कार्यक्रमानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झालेत पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही, याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. आमच्यासारख्या सिनीयर मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पाहा, असा सल्लाही त्यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics Sharad Pawar: ...तर शरद पवार काय आहेत, हे देशाला कळल नसतं: सुशीलकुमार शिंदे


राज्यात 700 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू करणार; आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्वाच्या घोषणा