Raids On Popular Front of India :  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात (PFI) आठवडाभरात दुसऱ्यांदा तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक तसेच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे. देशातील 8 राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून 247 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही पीएफआयविरोधात कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, पुणे, ठाणे, मुंबई, अहमदनगर, जालना, नांदेड, कल्याण, परभणी पुणे आदी ठिकाणी छापेमारी करण्यात आली. राज्यात 50 ते 55 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 


पुण्यातून 6 जण ताब्यात 


पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून ६ जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात घेतलं आहे. पुण्यात झालेली घोषणाबाजी आणि एनआयएच्या कारवाईच्या पार्शवभूमीवर ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. 


सोलापूरमध्येही PFI विरोधात NIA ची कारवाई


सोलापूरमधून NIA ने एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. PFI शी संबंधित असलेल्या एका व्यक्तीस NIA ने मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला NIA ने दिल्लीला घेऊन गेल्याची माहिती आहे. 


औरंगाबादमध्ये मोठी कारवाई 


औरंगाबादमध्ये एटीएस आणि औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई करताना पीएफआयच्या आणखी 13 ते 14 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसची रात्रभर छापेमारी करत कारवाई केली आहे.


कल्याणमधून पीएफआय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात 


कल्याणमधील पीएफआय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं करत ताब्यात घेतले आहे. फरदीन कल्याणमधील रोहिदास वाडा परिसरातील आहे. पहाटेच्या सुमारास फरदीनला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान फरदीनने कोणतेही चुकीचं कृत्य केलं नाही, आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.


जालन्यात PFI चा माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात


जालना जिल्ह्यामध्ये पीएफआयचा माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेतलं आहे. स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. आज पहाटे चंदनजीरा पोलिसांनी कन्हैयानगर भागातून या माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेतलं आहे. जालन्यातून आणखी एका PFI कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. 


नांदेडमध्ये कारवाई 


नांदेड येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आबेद अली मोहंमद अली खानला ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या सात वर्षांपासून तो PIF चा पूर्णवेळ सदस्य आहे. विविध ठिकाणी आंदोलन करून प्रक्षोभक भाषणे अनेकवेळा याच्याकडून करण्यात आली आहेत. त्याला NIA आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करत याला ताब्यात घेतलं आहे. 


अहमदनगर


राष्ट्रीय तपास यंत्रणेनेकडून (NIA) अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतलं आहे. नगर शहरातून आणि संगमनेरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आले. झुबेर अब्दुल सत्तार शेख (रा. अहमदनगर) आणि मौलाना खलिफ दिलावर शेख (रा. संगमनेर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या