Nanded Loksabha Potnivadnuk: राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून नांदेडच्या पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.  


वसंतरावंची गादी कोण चालवणार? 


2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसला वसंत चव्हाण यांची गादी त्यांच्या चिरंजीवानेच चालवावी असे वाटत होते त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता. भाजपमधून नांदेडच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी काही नावे समोर येत असून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणारी याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


निवडणूक आयोग करणार पोट निवडणुकीच्या तारखा जाहीर 


राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून निवडणूक आयोगाकडून दुपारी साडेतीन वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील 288 जागांसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. याचवेळी खासदार वसंतराव चव्हाण यांचा निधनानंतर रिक्त असणारी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीच्या तारखाही लागण्याची शक्यता आहे.


गेल्या लोकसभेत कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार ?


लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नांदेड चा निकाल काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांच्या बाजूने लागला. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेड मध्ये भाजपची सपशेल हार झाली. कोणत्या पक्षाकडून कोणते उमेदवार उभे होते? नांदेडमधील लोकसभेतील प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच दिसून आली. भाजपकडून प्रतापराव चिखलीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण उभे होते. तर बहुजन भारत पार्टीकडून हरि पिराजी भोयाळे इंडियन नॅशनल लिगकडून  कौसार सुलताना यांचाही पराभव झाला.


सध्या नांदेडच्या जागेवर किती आमदार आहेत?


नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09  (Nanded MLA List)


 किनवट विधानसभा - भीमराव केराम (भाजप)
 हदगाव विधानसभा - माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
 भोकर विधानसभा - अशोक चव्हाण (भाजप) - सध्या राज्यसभा खासदार 
 नांदेड विधानसभा - उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
नांदेड विधानसभा - दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
लोहा विधानसभा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
 नायगाव विधानसभा - राजेश पवार (भाजप)
 देगलूर विधानसभा -  जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
 मुखेड विधानसभा - तुषार राठोड (भाजप)