Swabhimani Shetkari Saghtana Parbhani : शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या शेतीला दिवसाही पाणी देता यावे, या उद्देशानं सरकारने सोलर पंप (solar pumps) संदर्भातील विविध योजना आणल्या आहेत. मात्र, तीन-तीन महिने होऊन गेल्यानंतर शेतकऱ्यांना सोलार कंपन्यांकडून सोलर पंप दिले जात नाहीत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक झाली आहे. परभणीतील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले.  


हजारो शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेत अर्ज केले आहेत. पैसे भरले, शेताचे सर्वे झाले असं असताना तीन-तीन महिन्यापासून या शेतकऱ्यांना सोलार पंप बसून देण्यात आलेले नाहीत. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे पंप तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी परभणीतील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांमध्ये सोलर पंप जर मिळाले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. 


शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून कृषीपंपाचा लाभ दिला जातो


शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषिपंपांचा लाभ दिला जातो. सहा महिन्यांत राज्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याला प्राधान्य दिले जात आहे. शेतकऱ्यांचा विद्युत पंपावर होणारा खर्च कमी करावा आणि सहजपणे दिवसा वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौरपंप योजनेतून दहा टक्के अनुदानावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषिपंपाचा लाभ दिला जातो. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्यांना दहा टक्के तर अनुसूचित जाती -जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. दिवसा वीजपुरवठा आणि लोडशेडिंग किंवा बिलाची चिंता नाही, असे सौर कृषिपंपांचे वैशिष्ट्य असल्याने शेतकऱ्यांकडून या योजनेतून सौरपंपाची मागणीही केली जात आहे. 


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' सुरू करण्यात आली आहे. यामुळे भारनियमनाची समस्या संपून, संपूर्ण आठ तास नियमित पाणी मिळण्यास मदत होईल. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील. लाभार्थी निवडीचे निकष महावितरणने निश्चित केले आहेत. पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांस 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा सौर कृषीपंप, 2.51 ते 5 एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरवरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल.


महत्वाच्या बातम्या:


ऊस बिलातून जवाहर कारखान्याने वसूल केले वीज बील, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक