परभणी : यंदा मराठवाड्यात (Marathwada) अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाई (Water Shortage) निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याच्या (Fodder) प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी काळात परभणी (Parbhani) जिल्ह्यात चार टंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि एकुण मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्याबाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये जेणे करुन जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 


सद्यःस्थितीत परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरासांठी चाऱ्याची टंचाई परीस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार दिनांक 1 एप्रिल, 2023 पासुन 3 लाख 65 हजार 174 मे. टन चारा शिल्लक असुन, तो अंदाजे एप्रिल 2024 पर्यंत पुरेल. ऐवढ्या चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, एकुण मिक्स रेशन (टीएमआर) वाहतुकीवर बंदी आणल्यास एप्रिल, 2024 अखेर पर्यंत चारा टंचाई भासणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि एकुण मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 


चारा  इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई 


जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील उत्पादीत होणारा चारा, मुरघास, आणि एकूण मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई केली आहे. सदरचा आदेश निर्गमित करण्यात आल्याच्या दिनांकापासुन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत. 


यंदा पावसाचे प्रमाण कमी...


यंदा परभणी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर, आता काही भागात पाणी टंचाई देखील निर्माण होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कमी पावसामुळे जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे उत्पन्न देखील कमी झाले आहेत. असे असतांना जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा एप्रिलपर्यंत पुरू शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या: 


PM Kisan Yojna : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नेमकी काय? आतापर्यंत किती हप्ते जमा झाले?