Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावेळी निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा देखील उल्लेख केला. या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत या योजनेतून 11.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारी मदत दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा किती मिळतो लाभ? 


पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा करते. केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर 2023 ला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आता शेतकऱ्यांना 16 व्या हफ्त्याची प्रतिक्षा आहे. 


18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित 


केंद्र सरकारने (Central Govrnment) दिवाळीनंतर शेतकऱ्यांना (Farmers) गोड भेट देत दिली होती. दिवाळी संपताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) पंधरावा हफ्ता जमा झाला होता. 15 नोव्हेंबर रोली देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. आता पंधराव्या हफ्त्यानंतर सोळाव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. आता पीएम किसान योजनेचा सोळावा हफ्ता केव्हा मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.


निधीत वाढ होणार का?


मार्च 2024 च्या पहिल्या पंधरवड्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.  मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 16 व्या आणि 17 व्या हप्त्याची रक्कम एकाच वेळी वाढवून जारी करु शकते. जेणेकरून निवडणुकीत शेतकऱ्यांची व्होट बँक मजबूत करता येईल. पाच वर्षांपूर्वी, 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (1 फेब्रुवारी 2024) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत तीन हप्त्यांमध्ये वार्षिक दिले जाणारे 6000 रुपये 8,000 ते 9,000 रुपये केले जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही.