एक्स्प्लोर

Sandeep Kshirsagar: परळी स्टाईलने एकच ठिकाणाहून पकडले..., परभणीत संदीप क्षीरसागर कडाडले; म्हणाले, वाल्मिक कराड...

Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder Case: शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर परभणीत यांनी जोरदार भाषण केले.  

Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज परभणीत (Parbhani Muk Morcha) सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, नरेंद्र पाटील, बजरंग सोनवणे, ज्योती मेटे सहभागी झाले. यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी जोरदार भाषण केले.  

आमच्या जिल्ह्यातील जवळचा मुलगा गेलाय. त्यांच्यासाठी तुम्ही जमलात, त्यासाठी सर्व परभणीकरांचे आभार मानतो.  ज्यावेळेस मी ही घटना समजून घेतली.  जेव्हा फोटो मला गावकऱ्यांनी दाखवले. तेव्हा माझे टाळके सटकले.  हा कुठलाही एका जातीचा विषय नाहीय.  सर्व पक्षाचे नेते इथे आहेत. सर्वजण न्याय द्या म्हणतात...आरोपी पुण्यात होते. 28 तारखेपर्यंत एका मोठ्या रुग्णालयात इलाज करत होते. ज्यादिवशी आपल्यासारखे लोक रस्त्यावर आलो तेव्हा हे फरार झाले. त्या रुग्णालयामध्ये कोण कोण भेटले ते सीसीटीव्हीतून बाहेर काढा?, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. 

परळी स्टाईलने एकच ठिकाणाहून पकडले- संदीप क्षीरसागर

माझ्या जे काही लक्षात आले आहे...हे सर्व फिल्म स्टाईलने, परळी स्टाईलने एकच ठिकाणाहून पकडले. मास्टर माइंड वाल्मिक कराड हा पुण्यात होता. दवाखान्यात बसून हे सर्व टीव्हीवर पाहत होता. अवैध धंदे बंद झाले. मात्र वाल्मिक कराडचा जेव्हा विषय येते. तेव्हा कुठेतरी विषय थांबवला जातो. वाल्मिक कराडच्या पाठीमागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. सदर प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा, धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन हटवा आणि जे सीडीआरमध्ये सापडतील, त्यांना फाशी द्या...अशी आमची मागणी आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी केली. 

नरेंद्र पाटील काय म्हणाले?

आज बीडनंतर प्रत्येक जिल्ह्यात लोकांचे नेतृत्व करणार...आमचा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. एकच मागणी आहे, आकाला उचला... त्याचा राजीनामा घ्या. या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड हा धनंजय मुंडे आहे, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितले. दरवेळेला लोक आमची भूमिका व्यक्त केली की संशय घेत होते. मात्र बीडमध्ये मी जी भूमिका मांडली त्यांनतर सर्वांना कळले, मी जातिवंत मराठा आहे. आम्ही आमच्या माणसाला न्याय देवू शकत नाहीत तर मग उपयोग काय?, माझी मराठा बांधवांना आणि बारा बलुतेदारांना आवाहन आहे, प्रत्येक जिल्ह्यात असा वाल्या निर्माण झालाय. अशा वाल्यांना सरकारने ठेचून मारले पाहिजे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली. 

संबंधित बातमी:

सरपंच हत्या प्रकरण: #3333 च्या मागे नेमकं काय लपलंय?; सुदर्शन घुलेच्या भावाच्या पोस्टची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
Asian Para Games 2026 : सुवर्णाचं 'सुवर्ण' यश! आशियाई पॅरा स्पर्धेत भारताचा डंका, थाळीफेकमध्ये पटकावले सुवर्ण पदक
सुवर्णाचं 'सुवर्ण' यश! आशियाई पॅरा स्पर्धेत भारताचा डंका, थाळीफेकमध्ये पटकावले सुवर्ण पदक
Horoscope Today 22 October 2026 : आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
IND vs NZ 1st T20 Live Streaming : Tik Tokवर टीम इंडियाची फ्री मॅच, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, सगळेच चक्रावले
Tik Tokवर टीम इंडियाची फ्री मॅच, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget