एक्स्प्लोर

Parbhani News: परभणीत शिवसैनिक आक्रमक! युवासेनेच्या नेत्यांंनी शिंदे समर्थनार्थ लावलेलं फाडलं बॅनर

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ परभणीत लावण्यात आलेले बॅनर्स युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले.

Parbhani News: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ परभणीत लावण्यात आलेले बॅनर्स युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले.एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर अगोदर या कार्यकर्त्यांनी ऑईल फेकले आणि जोरदार घोषणाबाजी करत हे बॅनर पूर्णपणे फाडून टाकले. शहरातील वसमत रस्त्यावर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मुरुंबा गावातील कैलाश झाडे आणि प्रमोद झाडे यांनी शिंदे साहेब समर्थक असे आशयाचे बॅनर्स लावले होते.याबाबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याना कळल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी जाऊन युवासेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी यावर ऑईल टाकत बॅनर्स फाडले यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषाबाजीही करण्यात आली.

शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी बंड केल्याने राज्यातील शिवसैनिकांनी वेगवेगळ्या मार्गाने शिंदे गटाचा विरोध दर्शवला. त्यात अनेक ठिकाणी मोर्चे, ऑफिस तोडफोड, वेगवेगळे आंंदोनल, बॅनर्सवर काळं फासणे आणि सगळ्या आमदारांची अंतयात्रा काढून विरोध दर्शवला आहे. उद्या बहुमत चाचणी होणार आहे त्यानंतर  या सगळ्यांना पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे. 

पुण्यात देखील घडला असाच प्रकार

पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ फ्लेक्स लागला पण काही वेळातच मुख्यमंत्री ठाकरे समर्थकांनी तो फ्लेक्स फाडून टाकला. महापालिके समोरील चौकात हा फ्लेक्स आजच लागला होता, 'आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक' असा आशय त्यावर होता. याची कल्पना ठाकरे समर्थक शिवसैनिकांना मिळताच, त्यांनी काही वेळातच फ्लेक्स फाडला. यामुळं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सचिन अहिर शहरात आले होते. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आयोजित मेळाव्यात अहिरांनी उपस्थिती लावली. शहरातील शिवसैनिकांनी एकजुठीने ठाकरेंच्या पाठीमागे उभ राहायचं, असा निर्धार करण्यात आला. मात्र त्यानंतर चोवीस तासाच्या आतच एकनाथ शिंदे समर्थनार्थ फ्लेक्स लागला अन तोच फ्लेक्स उद्धव ठाकरे समर्थकांनी फाडून टाकला. या प्रसंगामुळं शहरात ही ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : 90च्या दशकातील तथाकथित 'डॉन'च्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा; 'बाबा' डॉनच्या घरात 5 करोड रोख, सोन्या-चांदीसह मोठं घबाड सापडलं
90च्या दशकातील तथाकथित 'डॉन'च्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा; छत्रपती संभाजीनगरच्या 'बाबा' डॉनच्या घरात 5 करोड रोख, सोन्या-चांदीसह मोठं घबाड सापडलं
Shahajad Bhatti News : सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती
सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Dhairyasheel Mohite Patil: 'उद्या आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन'; आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल
'उद्या आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन'; आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Embed widget