Warli Painting : पालघर (Palghar) जिल्ह्यातील महिला वारली चित्रकारांनी (Warli Painting) पुन्हा एकदा वारली चित्रकलेला जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिलं आहे. पालघर येथील 'द धवलेरी ग्रुप' च्या सहा महिला वारली चित्रकारांनी औरंगाबाद (Aurangabad) इथे 3200 चौरस फुटांची वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंग (World Largest Warli Painting) काढून नवा विक्रम केला आहे. पालघर इथल्या सहा आदिवासी वारली आर्टिस्ट आणि औरंगाबादच्या 120 स्थानिक मुलींच्या माध्यमातून ही वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेटिंग साकारण्यात आली आहे. यामध्ये वारली महिलेचे जन्मपासून ते मृत्यूपर्यंत जे पारंपरिक काम दाखवण्यात आले आहे.


G-20 परिषदेनिमित्त वारली पेंटिंग, विश्वविक्रमाला गवसणी


G-20 परिषदेनिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट  सिटीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. 456 फूट लांब आणि सात फूट उंच अशा 3200 चौरस मीटरच्या भिंतीवर लार्जेस्ट वारली पेंटिंग साकारण्यात आली. G-20 परिषदेचा मान औरंगाबाद शहराला मिळाल्यानंतर, औरंगाबाद महापालिकेने वारली पेंटिंग काढण्याचे ठरवले. यासाठी पालघरमधील 'द धवलेरी ग्रुप'च्या सहा महिला चित्रकार औरंगाबाद इथे गेल्या होत्या. यावेळी 120 महिलांनी अवघ्या सहा तासात ही चित्रकला साकारत विश्वविक्रमाला (World Record) गवसणी घातली. या अनोख्या वारली चित्रकलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.


Warli Painting : पालघरच्या वारली चित्रकलेचा जागतिक पातळीवर ठसा, औरंगाबादमध्ये अवघ्या सहा तासात साकारलं जगातील सर्वात मोठं वारली चित्र!


पेंटिंगद्वारे आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेल्या नात्याचं दर्शन


औरंगाबाद इथे गेलेल्या वारली चित्रकारांमध्ये किर्ती वरठा, पूनम कोल, तारा बोंबाडे, राजेश्री भोईर, तनया उराडे, शालिनी कासट अशा सहा कलाकारांचा समावेश आहे. या पेंटिंगमध्ये जन्मावेळी सुईण महिला, लग्नाच्या वेळी सुवासिन आणि धवलेरी महिला यांच चित्र रेखाटण्यात आलं आहे. धवलेरी महिलांच्या हातून आमचे लग्न लावतात, असं या महिला कलाकारांनी सांगितलं. महिलेचे महत्त्वाचे स्थानही वारली पेंटिंगच्या माध्यमातून दाखवले आहे. संपूर्ण वारली पेंटिंगमध्ये आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले नाते, वारली नृत्य, राहणीमान, सण, जल, जंगल, जमिनीशी संवाद दाखवण्यात आले आहेत.


'ही केवळ चित्रकला नसून आदिवासी लिपी'


पेंटिंगमधून वारली चित्रकला ही केवळ पेंटिंग नसून आदिवासी (वारली) लिपी आहे. यामध्ये आदिवासी समाजाचे निसर्गाशी जोडलेले अतूट नाते दर्शवते. आदिवासींचे जगणे जर इतर समाजांनी स्वीकारले तर आज जे आपल्याला पर्यावरणाच्या धोका आहे तो थांबू शकतो, असा संदेश देण्यात आला आहे.