Warli Painting : पालघरच्या वारली चित्रकलेचा जागतिक पातळीवर ठसा, औरंगाबादमध्ये अवघ्या सहा तासात साकारलं जगातील सर्वात मोठं वारली चित्र!

पालघरमधील सहा महिला चित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली 120 महिला चित्रकरांनी औरंगाबादमध्ये जगातील सर्वात मोठं वारली चित्र साकारलं आहे.

Warli Painting

1/10
पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकलेने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.
2/10
पालघरमधील सहा महिला चित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली 120 महिला चित्रकरांनी औरंगाबादमध्ये जगातील सर्वात मोठं वारली चित्र साकारलं आहे.
3/10
G-20 परिषदेनिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.
4/10
456 फूट लांब आणि सात फूट उंच अशा 3200 चौरस मीटरच्या भिंतीवर लार्जेस्ट वारली पेंटिंग साकारण्यात आली.
5/10
G-20 परिषदेचा मान औरंगाबाद शहराला मिळाल्यानंतर, औरंगाबाद महापालिकेने वारली पेंटिंग काढण्याचे ठरवले.
6/10
यासाठी पालघरमधील 'द धवलेरी ग्रुप'च्या सहा महिला चित्रकार औरंगाबाद इथे गेल्या होत्या.
7/10
यावेळी 120 महिलांनी अवघ्या सहा तासात ही चित्रकला साकारत विश्वविक्रमाला गवसणी घातली.
8/10
या अनोख्या वारली चित्रकलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
9/10
या चित्रात वारली महिलेचे आयुष्य, लग्नापासून ते मृत्यूपर्यंतचे पारंपरिक, दैनंदिन जीवन, विविध विधी दर्शवण्यात आलं आहे.
10/10
आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते, पारंपरिक नृत्य, राहणीमान, सण-उत्सव, जल-जंगल-जमिनीशी जुळलेली नाळ इत्यादी लहानसहान बाबींना या चित्रात स्थान देण्यात आले आहे.
Sponsored Links by Taboola