Cyrus Mistry Accident : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर तब्बल चार महिन्यांनी पालघर पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलं आहे. कार अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबत आणखी एकाचा मृत्यू झालाय होता. अनेक प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानंतर पोलिसांनी पालघर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे.


महिला कार चालक अनहीता पंडोल यांनी निष्काळजीपणानं आणि अति वेगानं कार चालवण्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. 4 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलाला धडकून कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर महिला कारचालक अनहीता पंडोल आणि एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर अतिवेगानं आणि निष्काळजीपणानं कार चालवण्याचा ठपका ठेवत, कासा पोलिसांनी महिला कार चालकावर गुन्हा दाखल केला होता. आता याच प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. 


4 सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकाला धडकून उद्योजक सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल (54) यांचा मृत्यू झाला होता. वाहन चालवत असलेल्या अनाहिता पंडोल (55 वर्ष) आणि दारियस पंडोल हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले होते.


पालघर जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी 5 नोव्हेंबर रोजी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 304-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत), 279 (सार्वजनिक मार्गावर निष्काळजीपणे वाहन चालवणं किंवा वाहन चालवणं), 337 (मानवी जीवाला धोका निर्माण करणं) आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


पोलिसांनी साक्षीदार तपासलं आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि मर्सिडीज बेंझ इंडिया, पुणे यांच्याकडून अहवाल प्राप्त केला. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांनी सीट बेल्ट घातला नसल्याचं पोलिसांनी यापूर्वीही सांगितलं होतं. प्रथमदर्शनी, अतिवेग आणि चालकाच्या निर्णयातील त्रुटीमुळे हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. 


कसा आणि कुठे झाला सायरस मिस्त्रींचा अपघात? 


प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा वयाच्या 54 व्या वर्षी अपघात झाला होता. याच अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत असताना हा अपघात झाला होता. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्री यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झाला होता. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली होती. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला होता. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Cyrus Mistry Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांना आमंत्रण? सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर बंद केलेले अनधिकृत फाटे पुन्हा सुरू