पालघर : डोंबिवलीतील एमआयडीसीत स्फोट झाल्याच्या घटना ताज्या असतानाचा बोईसर तारापूर (MIDC) औद्योगिक कार्यक्षेत्रात गॅस गळतीची (Gas leakage) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गॅस गळती झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तेथील विविध कंपन्यांतून बाहेर येत घटनास्थळी धाव घेतली होती. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी-150 मधील आरती ड्रग्स कारखान्यातून विशिष्ट प्रकारचा गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळाली आहेय. गॅस लिकेज झाल्यानंतर कामगारांमध्ये गोंधळ उडाला असून त्यांनी धावपळ केली. यावेळी, कारखान्यातून सर्व कामगार बाहेर पडले. याबाबत, तात्काळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन (Fire Brigade) दलास पाचारण करण्यात आले होते, अग्निशमन दलानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 


बोईसर तारापूर एमआयडीसीतील आरती ड्रग्स या कंपनीत आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाली. या कारखान्यात ब्रोमीन गॅसची गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या गळतीमुळे कारखान्यातील कामगारांमध्ये भीतीच वातावरण पसरलं होतं. गळती होताच कामगारांनी कारखान्यांमधून पळ काढला असून या गॅस गळतीमुळे परिसरात पिवळ्या कलरच्या धुराचा साम्राज्य पसरल होतं. घटना घडताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली, त्यानंतर कंपनीतील संबंधितांनीही गॅस गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याने, कारखान्यातील वायुगळती थांबवली गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, या गॅस गळतीनंतर कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढला असून कोणीही कामगार आतमध्ये अडकलं नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, या गॅसमुळे काही कामगारांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे .


विजेचा धक्का लागून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू 


वसई पूर्वेकडील अगरवाल उद्योग नगरीत मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास विजेचा धक्का लागून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा अज्ञात व्यक्ती येऊन महावितरणच्या बॉक्समध्ये काही तरी छेडखानी करतं असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. ही छेडखानी करतं असतानाच अचानक वीजेचा धक्का लागला आणि ह्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. अद्याप ही व्यक्ती कोण आहे, ह्याची माहिती मिळाली नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा


''उद्धवजी, मग ऐनवेळी असं का केलं?; लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका''; पाटलांच्या पराभवाने पाटील संतापले