'भाजप आणि मित्रपक्षांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि भरभराटीसाठी त्यांच्यासोबत काम करायला मिळेल अशी अपेक्षा', असं ट्वीट इम्रान खान यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी इम्रान खान यांनी भारतात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला तर भारतासमवेत शांततेची आणि काश्मीर प्रश्नाची चर्चा करण्याची अधिक चांगली संधी उपलब्ध होईल, असे मत इम्रान खान यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केले होते.