उस्मानाबाद : ईडीने (ED) उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा एमआयडीसीतली एका मद्य निर्मिती कंपनीची संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती 46 कोटी रूपये किंमतीची आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. जोगेश्वरी ब्रेवरीज प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. 


जोगेश्वरी ही  अल्कोहोलची फॅक्टरी आहे. हैदराबाद मुंबई महामार्गावर उमरगा एमआयडीसीमध्ये ही कंपनी आहे. परंतु, गेल्या चार वर्षापासून कंपनी बंद आहे. उमेश शिंदे हे या कंपनीचे मालक असतून ते कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. जोगेश्वरी ब्रेवरीज प्रायव्हेट लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा  30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती.  


कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता पुत्र संचालक असलेल्या फॅक्टरिची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. ईडीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करुन या कारवाईची माहिती दिली आहे.




कंपनी कायद्यातर्गत ही जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 5 मार्च 2009 रोजी नोंदणी  केली आहे. त्यानुसार 15 कोटी हे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे. तर पेड कॅपिटल हे 2 कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ही 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून 31 मार्च 2021 पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे. तर 133602 हा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स या अंतर्गत याची नोंदणी असून ही कंपनी दारू निर्मिती करत होती.