Osmanabad Crime News: उस्मानाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने शिक्षक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर नराधम शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून हा शिक्षक पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. यात मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली. त्यामुळे पिडीत मुळच्या फिर्यादिवरून अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुलीला दिली होती धमकी...
मुलीवर अत्यचार केल्यानंतर शिक्षकाने कुणालाही याबाबतीत काहीही सांगायचं नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे मुलगी घाबरून गेली होती. तसेच पिडीत मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली. दरम्यान पिडीत मुलगी स्कुटिवर प्रवास करत असताना तिला रक्तस्रावाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी उस्मानाबाद येथील महिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यांनतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मुलीच्या जबाबनुसार कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.