Osmanabad farmers news : शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलावरुन राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे बिल देण्याच्या मागणीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्ह्यात अतिरिक्त झालेला  ऊस शेतकऱ्यांनी जिल्हाबाहेरील साखर कारखान्याकडे पाठवला. मात्र, अद्यापपर्यंत ऊस बिलाचा पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससह शेतकरी चांगलेच आक्रमक झाले  आहेत. येत्या आठ दिवसात जर शेतकऱ्यांनी उसाची बिलं दिली नाहीत तर आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


ज्या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं अडकली आहेत, त्या साखर कारखान्यांनी पुढच्या आठ दिवसात शेतकऱ्यांना बिल द्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 2021-22 च्या मार्च महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम, उस्मानाबाद, वाशी, तुळजापूर या भागातील शेतकऱ्यांनी अतिरीक्त ऊस जिल्ह्याच्या बाहेरच्या आणि जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे दिला. आज ऊस देऊन पाच महिने झाले तरी या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल FRP प्रमाण अद्याप दिलेली नाही.  गेले पाच महिने झाले शेतकरी साखर कारखानादरांकडे हेलपाटे मारत आहेत. परंतू त्यांना कोणताही घाम फुटत नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करत असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.


कारखानदारांना इशारा


आम्ही साखर कारखानदारांचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सोलापूर जिल्ह्यातील गोकूळ, सिद्धेश्वर, जय लक्ष्मी, जय हिंद, लोकमंगल अशा कारखान्यांनी जर येत्या आठ दिवसात 
पैसे दिले नाहीत तर त्या कारखानदाराचं खाली डोक वर पाय केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.


गोकूळ कारखान्याला 29 मार्चला माझा ऊस गेला आहे. तेव्हापासून माझ्या उसाचे बील अजून मिळाले नाही. मी सारखे फोन करत आहे, पण अधिकारी फोन उचल नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली. दोन हेक्टर क्षेत्वार ऊस केला होती. तो ऊस कारखान्याला लावण्यासाठी 50 हजार रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती शेतकरी तुमकाराम घोगरे यांनी दिली.  लोकांकडून पैसे घेऊन मी कारखान्यावर हेलपाटो मात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


महत्वाच्या बातम्या: