Maharashtra Richest Person : माणसाकडे पैसा असला की तो श्रीमंत म्हणून ओळखला जातो. या अमाप संपत्तीमधून तो काही वेळेस समाजातील काही उपक्रमांना देणगी देतो. महाराष्ट्रात असे हजारो श्रीमंत आहेत. मात्र, या सगळ्यांपेक्षा एक वेगळा श्रीमंत माणूस समोर आला आहे. ही श्रीमंत व्यक्ती कोणी बडी आसामी नसून सामान्य शेतमजूर आहे. मात्र, समाजाला आपलं काही देणं आहे, या भावनेतून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत माणूस हा मनुष्य शेतमजूर आहे. पत्नीसह इतरांच्या शेतात काम करून वर्षभर पैसे जमा करतात. त्या पैशातून त्यांनी या वर्षी गावातल्या सरकारी शाळेला एक लाख रुपये देणगी दिली आहे. त्याच्या आधीच्या वर्षी 35 हजाराची विद्युत उपकरणे बसवून दिली आहेत. तर, मागील सात वर्षे आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृती निमित्त 600 विद्यार्थ्यांना जेवण देतात. गावात वाचनालय चालवतात. महाराष्ट्रातील या श्रीमंत व्यक्तीचे नाव आत्माराव सोनवणे असे असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या खामसवाडी गावात राहतात.
आत्मराम सोनवणे हे खामसवाडी गावात पत्र्याच्या तीन खोलीत राहतात. त्यांच्याकडे एक गुंठा जमीनदेखील नाही. त्यांच्याकडे शासकीय नोकरी देखील नाही. मात्र, त्यांच्या श्रीमंतीचा महिमा मोठा आहे. सोनवणे यांनी शेतात काम करून जमा केलेल्या एक लाख एक हजार रुपयांमधून इयत्ता दहावीसाठी 40 बाकडे बनवण्याते काम सुरू आहे.
गावात एखाद्या व्यक्तीने एवढी देणगी देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्थानिक म्हणतात. गेल्यावर्षी सोनवणे यांनी शाळेला 40 हजार रुपये खर्च करून लाइट फिटींग करून दिली आहे. गावातील सर्व शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेऊन बक्षिसांचे वाटप केले आहे. घरात वाचनालय सुरू केले आहे. हा सगळा खर्च शेतात मजुरी करून
सोनवणे यांचा मुलगा गोपाळ याचे 2016 साली निधन झाले होते. गोपाळ न्यायालयात सेवक होता. तो गेला तेव्हापासून आत्मराम सोनवणे यांनी मुलाची सरकारी शाळात दत्तकच घेतली आहे. गोपाळचे मित्र गावात आहेत. त्यापैकी एक असलेल्या वाजिद अत्तारचे वेल्डींगचे दुकान आहे. तिथेच आता शाळेत देणगी म्हणून देण्यात येत असलेले बाकडे बनत आहेत.
कोट्यवधी रुपये जवळ असलेले जगात बरेच आहेत. सोनवणे यांचेकडे काहीच नाही. ना शेत, ना नोकरी, ना उद्योगधंदा. परिस्थितीने गरीब परंतु मनाने श्रीमंत असलेल्या या शेतमजुराला मुलांनी शिकावे वाटते. त्यासाठी ते करत असलेले काम खूप मोठे आहे. हे काम महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत माणूसच करू शकतो.
पाहा व्हिडिओ : Maharashtra Rich Man : शेतमजूर करतो लाखोंची मदत; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत माणसाची कहाणी