नवी दिल्ली : बिहारच्या नावदा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी' (All India Pregnarnt Job Agency) बनवून फसवणूक करणाऱ्या 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ज्या महिलांना मुल होत नाही, त्यांना प्रेग्नंट करा आणि लाखो रुपये मिळवा, असे सांगून नोंदणीसाठी ऑनलाईन पैसा उकळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींच्या गंडा घालण्याच्या या नव्या कल्पनेने पोलिसही चक्रावले आहेत. 


नोंदणीच्या नावाने उकळली लाखोंची रक्कम 


ज्या महिलांना मुल होत नाही, त्यांना प्रेग्नंट करायचंय. महिलांना प्रेग्नंट केल्यास लाखो रुपये दिले जातील, असे सामान्य लोकांना कॉल करुन सांगितलं जात होतं. 8 जणांच्या टोळीकडून सामान्य लोकांशी मोबाईलवरुन संपर्क केला जात होता.  त्यानंतर त्यांच्याकडून नोंदणीसाठी मोठी रक्कम ऑनलाईन मागवली जात होती. टोळीच्या आश्वासनाला लोक बळी पडले आहेत. नोंदणीच्या नावाने या टोळीने अनेकांना 5 ते 20 हजार रुपयांना गंडा घातलाय. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टोळीने लोकांकडून 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी' बनवली. त्यानंतर लोकांना पैसे कमवण्याची ऑफर देऊन नोंदणी करण्यास सांगितले. या नोंदणीसाठी 5 ते 20 दरम्यान रक्कम आकारण्यात येत होती. सर्वांत प्रथम नोंदणीसाठी 799 रुपये आकारण्यात येत होते. याशिवाय सुरक्षेच्या नावाखालीही रक्कम घेतली जात होती. सुरक्षेसाठी 5 ते 20 हजार रुपये आकारले जात होते. 


पोलिसांना एकाच ठिकाणाहून 8 जणांना घेतले ताब्यात 


लोकांना गंडा घालणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. गुरमा येथे असलेल्या एका घरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. राजेश कुमार, प्रभात कुमार वर्मा, कवींद्र प्रसाद कुमार, गोपाल दास, अनिल कुमार, अजय कुमार आणि लक्ष्मण कुमार असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 


आरोपींचे मोबाईल, प्रिंटर पोलिसांकडून जप्त 


ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 9 मोबाईल आणि १ प्रिंटर ताब्यात घेतला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी एक वेगळी टीम तयार केली होती. नावदा जिल्ह्यात सायबर क्राईम करणाऱ्या लोकांची संख्या वाढलीये. यामध्ये अनेक युवक सामील होत आहेत. नव्याने आलेल्या लोकांना लोकांना गंडा घालण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते.  त्यामुळे नावदा जिल्ह्यात सायबर क्राईची अनेक प्रकरण समोर येत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या