बंगळुरु : सध्या नवे वर्ष सुरु होण्यापूर्वी 31 डिसेंबरचा (31 December) माहोल सुरु आहे. अनेक तरुण 31 डिसेंबरची पार्टी करण्यासाठी बाहेर पडत असतात. काही जणांनी 1-2 दिवस अगोदरचं पार्टी करण्यास सुरुवात केलीये. दरम्यान एका पार्टीतून धक्कादायक प्रकार समोर आलाय. बंगळुरुमधील एक 27 वर्षीय अभियंता पार्टी करण्यासाठी मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो पार्टी सेलिब्रेट करत होता. मात्र, सिगारेटची अ‍ॅश (cigarette ash) फेकण्यासाठी तो बाहेर आला आणि 33 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी अंत झालाय. ही घटना बंगळुरुतील पश्चिम भागात घडली आहे. दिव्यांशू शर्मा असे मृत्यू झालेल्या 27 वर्षीय अभियंत्याचे नाव आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे. 


वडिल नौदलातील होते कार्यरत


दिव्यांशू शर्मा (Divyanshu Sharma) हा अॅश फेकण्यासाठी फ्लॅटच्या बाहेर आला तेव्हा तो झोपत होता. यावेळीच तो बंगळुरुमधील अपार्टमेंटमध्ये वॉकिंग ट्रॅकवर कोसळला, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आलीये. दिव्यांशू शर्मा हा मूळचा उत्तरप्रदेशातील राहिवासी आहे. सध्या तो बंगळुरूतील कोडिगेहल्ली भागातील (केआर पुरा) या भागात राहत होता. त्याचे वडिल भारतीय नौदलात कार्यरत होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. सध्या ते कुटुंबातील इतर सदस्यासमवेत Horamavu येथे राहत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. 


अशी पटली ओळख


दिव्यांशू मृत अवस्थेत सापडल्यानंतर सोसायटीतील लोकांनी सकाळी याबाबतची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन सर्वांना दिली. "एका व्यक्तीचा मृत्यूदेह वॉकिंग ट्रॅकवर आढळला. त्याच्याजवळून आयडी सापडल्यामुळे त्याची लगेच ओळख पटली. त्यानंतर त्याच्या सर्व मित्रांची आम्ही चौकशी केली. तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे पाहण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहोत, असे पोलिसांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Teacher Student Photos : विद्यार्थ्यासोबतच्या 'त्या' Viral रोमँटिक फोटोशूटवर शिक्षिकेचं उत्तर, म्हणाली, ''आमचं नातं...''


Morning Headlines 31st December: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज