नागपूर : चालु सत्रात क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष आर. विमला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीमध्ये 2022-23 या सत्रापासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा (मनपा स्तरीय) महानगर पालिका नागपूर यांना सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद याचे संयुक्त विद्ममाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व जिल्हास्तरीय शालेय मनपा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार महानगर पालिका क्षेत्रातील शाळांना क्रीडा स्पर्धेकरीता स्वतंत्र जिल्हास्तर दर्जा देण्यात आलेला आहे व महानगर पालिका क्षेत्रामधील जिल्हास्तरीय मनपा क्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी महानगर पालिकांना देण्यात आली आहे.
त्यानुषंगाने चालु वर्षापासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांचे द्वारे फक्त नागपूर जिल्हास्तरीय ( महानगर पालिका क्षेत्राबाहेरील ) शाळांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मनपा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन नागपूर महानगर पालिका यांचेमार्फत करण्यात येणार आहे. सर्व शाळा व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी कळविले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या